Advertisement

दिल्ली-मुंबई इंडिगोचं विमान पक्षी घडकल्याने माघारी फिरले

दिल्ली-मुंबई इंडिगोचं विमान पक्षी घडकल्याने रविवारी माघारी फिरले. कोणतीही दुर्घटना यावेळी घडली नाही.

दिल्ली-मुंबई इंडिगोचं विमान पक्षी घडकल्याने माघारी फिरले
SHARES

दिल्ली-मुंबई इंडिगोचं विमान पक्षी घडकल्याने रविवारी माघारी फिरले. कोणतीही दुर्घटना यावेळी घडली नाही. विमान सुखरूपपणे मुंबईच्या विमानतळाकडे माघारी फिरले.    

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगोच्या ६ई ५०४७ या विमानाने सकाळी ८ वाजता उड्डाण केले. हे विमान नवी दिल्लीला १०.१५ वाजता पोचणार होते. उड्डाण होत असतानाच विमानाला पक्षी धडकला. पक्षी धडकून विमान बरेच पुढे निघून गेले. यामध्ये विमानाच्या इंजिनाचे थोडं नुकसान झालं. त्यामुळे वैमानिकाने विमान पुन्हा मुंबई विमानतळावर माघारी फिरवण्याचा निर्णय घेतला. विमान सुरक्षित खाली उतरल्यावर प्रवाशांना अन्य विमानाने दिल्लीला पाठविण्यात आले. सर्व १२३ प्रवासी व विमानातील कर्मचारी सुरक्षित होते.

महिनाभरापूर्वी एअर एशियाच्या विमानातही अशीच एक घटना घडली होती. ८ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. एअर एशियाचे विमान रांचीहून मुंबईला जाणार होते. विमानाने उड्डाण केल्यावर एक पक्षी विमानाला धडकला.  त्यामुळे विमान पुन्हा माघारी फिरवण्यात आले. 


हेही वाचा -

मुंबईतील कोरोनामुक्तांचं प्रमाण ८२ टक्क्यांवर

लाॅकडाऊनचे उल्लघंन केल्याप्रकरणी राज्यात २ लाख गुन्हे दाखलRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा