Advertisement

रेल्वे मार्गावरील 'त्या' १९ स्थानकांच्या विकासाची रखडपट्टी

स्थानकांतील प्रत्यक्षात कामाला डिसेंबर २०२१ पासून सुरुवात होणार आहे. या स्थानकांत मोठ्या प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

रेल्वे मार्गावरील 'त्या' १९ स्थानकांच्या विकासाची रखडपट्टी
SHARES

मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून पश्चिम व मध्य रेल्वेवरील १९ उपनगरीय स्थानकांचा विकास करण्यात येणार होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं ही विकासकामं रखडली आहेत. मागील २ वर्षांपासून प्रकल्पाबाबत चर्चा होत असतानाच आता विकासकामांचा आराखडा तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे.

स्थानकांतील प्रत्यक्षात कामाला डिसेंबर २०२१ पासून सुरुवात होणार आहे. या स्थानकांत मोठ्या प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. प्रवाशांच्या तुलनेत उपनगरी स्थानकातील सुविधा अपऱ्या आहेत. अरूंद प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मवरील जागा अडवणारे स्टॉल यांमुळं प्रवाशांना चालणंही कठीण होतं. त्यात अपुरे पादचारी पूल, सरकते जिने, प्रसाधनगृहांची कमतरता व त्यांची स्वच्छता असे अनेक प्रश्न आहेत.

त्यामुळंच, एमआरव्हीसीमार्फत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे, डोंबिवलीसह एकूण सात, हार्बरवरील चेंबूर, गोवंडीसह ४ आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेन्ट्रल, जोगेश्वरी, कांदिवली यांसह एकूण ८ स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. यामुळं स्थानकांवर अनेक सुविधांची भर पडणार आहे. शिवाय, प्रकल्पाबाबत मागील २ वर्षांपासून चर्चा सुरू आहे.

प्रकल्प राबवताना येणाऱ्या अडचणी, तसेच नेमक्या कोणत्या सुविधा द्याव्यात इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी मार्च २०२० मध्ये सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, कोरोनामुळे जारी झालेल्या लॉकडाऊनमुळं ही प्रक्रिया थंडावली. काही महिन्यांनी सल्लागार नेमल्यानंतर त्याचा अहवाल नुकताच सादर करण्यात आला. आता प्रत्येक स्थानकातील विकास कामांचा आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.

'असा' होणार विकास

  • रेल्वे स्थानक हद्दीत जास्तीत जास्त मोकळी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न
  • फलाटावर प्रवाशांना वावरण्यासाठी अधिक जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील.
  • नवीन पादचारी पूल, अधिक सरकते जिने, लिफ्ट
  • पादचारीपूल आणि स्कायवॉक जोडण्याचा प्रयत्न व त्यात काही बदल
  • तिकीट खिडक्यांच्या, खाद्यपदार्थ स्टॉलच्या रचनेत बदल
  • चांगली आनसव्यवस्था आणि प्रसाधनगृहे
  • प्रवाशांसाठी उन्नत डेक
  • स्थानकात अधिक दिवे बसविणार
  • विकासित केली जाणारी १९ स्थानकं

मध्य रेल्वे

  • भांडुप
  • मुलुंड
  • ठाणे
  • डोंबिवली
  • शहाड
  • नेरळ
  • कसारा

हार्बर मार्ग

  • जीटीबी नगर
  • चेंबूर
  • गोवंडी
  • मानखुर्द

पश्चिम रेल्वे

  • मुंबई सेन्ट्रल (लोकल)
  • खार रोड
  • जोगेश्वरी
  • कांदिवली
  • मीरा रोड
  • भाईंदर
  • वसई रोड
  • नालासोपारा
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा