Advertisement

बेस्टला चालक कम वाहक नकोच!


बेस्टला चालक कम वाहक नकोच!
SHARES

बेस्ट सध्या तोट्यात आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून बेस्ट प्रशासनाने चालक कम वाहक असा नवीन प्रवर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव गुरुवारी बेस्ट परिवहन उपक्रमातर्फे झालेल्या बैठकीत बेस्ट समितीसमोर मुंजरीसाठी सादर केला होता. पण समितीच्या सदस्यांनी हा प्रस्ताव फेटाळला.

भविष्यात बेस्ट बसच्या वाहक-चालक कर्मचाऱ्यांची भरती करताना वाहक-चालक या दोन्ही पदांसाठी पात्र ठरतील असेच उमेदवार निवडावेत, अशी मागणी बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आली होती. पण एकच व्यक्ती वाहक आणि चालकाचे काम करू शकणार नसल्याचे म्हणत बेस्ट बस समितीच्या सदस्यांनी हा प्रस्ताव एकमताने नामंजूर केला.


हेही वाचा

बेस्टचा तोटा नव्या कोऱ्या बसेसच्या मुळावर...


सध्या बेस्टमध्ये 12 हजार 290 वाहक (कंडक्टर) आहेत तर, 11 हजार 742 चालक आहेत. 75 टक्के उमेदवारांची वाहक आणि चालक म्हणून नेमणूक करावी तर, 25 टक्के उमेदवारांची चालक कम वाहक म्हणून नेमणूक करावी, अशी सूचना बेस्ट प्रशासनाने या प्रस्तावात नमूद केली होती. पण बैठकीतल्या समितीच्या सदस्यांनी प्रस्ताव फेटाळून लावला.

मुंबईसारख्या शहरात चालक कम वाहक हा उपक्रम यशस्वी होऊ शकणार नाही, असे समितीतील सदस्य सुनील गणाचार्य यांनी सांगितले. सध्या मुंबईत 3577 बसेस रस्त्यावर धावतात. बेस्टची पाँईट टू पाँईट सेवा उपलब्ध नसून बेस्टला स्वयंचलित दरवाजे देखील नसल्याचा मुद्दा यावेळी विरोधीपक्ष नेता रवीराजा यांनी मांडला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा