Advertisement

लोकल सुरु झाल्यानं मुंबईत कोरोना वाढला – मुंबई महापालिका आयुक्त


लोकल सुरु झाल्यानं मुंबईत कोरोना वाढला – मुंबई महापालिका आयुक्त
SHARES

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतील कोरोनाचा हा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपायोजना केल्या जात आहेत. विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी मार्शल्सची संख्या वाढवण्यात आली आहे. मुंबईमधील या रुग्णवाढीसाठी लोकल सेवेकडे बोट दाखवले जात आहे. शिवाय, मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु होऊन ३ आठवडे झाले असून, मुंबईत कोरोना रुग्णवाढीमागे लोकल ट्रेन एक कारण असू शकते असे इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलं आहे.

मुंबई लोकलमधून दिवसाला ५० लाख लोक प्रवास करतात. मागच्यावर्षीच्या मार्च महिन्यापासून ते ३१ जानेवारीपर्यंत लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद होती. एक फेब्रुवारीपासून आपण सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु केली.  लोकलमुळं कोरोना रुग्ण संख्येमध्ये वाढ होतेय का? हे समजायला ३ आठवडे लागतील, असे त्यावेळी मी म्हटले होते. सद्यस्थितीत लोकल सुरु होऊन ३ आठवडे झाले आहेत. कोरोनाकाळात मोठया प्रमाणात लोकल ट्रेनमधुन प्रवास सुरु आहे. त्यामुळे रुग्णवाढीचा लोकलशी संबंध असू शकतो, असं इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलं.

खासगी आणि सरकारी रुग्णालयांबरोबर बैठक केली आहे. कोरोना सेंटर आणि जम्बो फिल्ड हॉस्पिटल सक्रिय करत आहोत, असे चहल यांनी स्पष्ट केलं. रविवार आणि सोमवार असे सलग २ दिवस कोरोना रुग्ण संख्या वाढल्यानंतर मंगळवारी कोरोना रुग्ण संख्येत काहीशी घट झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, नागरिकांनी कोरोना रोखण्यासाठी सर्व आवश्यक नियमांचे पालन करावे, अन्यथा लॉकडाउन करावे लागेल असा इशारा दिला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा