Advertisement

पहिल्या रेल्वेचं ऐतिहासिक इंजिन जतन करा - ठाणेकरांची मागणी


पहिल्या रेल्वेचं ऐतिहासिक इंजिन जतन करा - ठाणेकरांची मागणी
SHARES

देशातील पहिली रेल्वे गाडी 16 एप्रिल 1853 साली मुंबई ते ठाणे अशी धावली. त्यामुळे ठाणे स्थानकाला ऐतिहासिक स्थानकाचा दर्जा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकाचा 164 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यामुळे त्या पहिल्या रेल्वे गाडीचे इंजिन ठाणे स्थानकात आठवण म्हणून ठेवावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. या मागणीकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्या विरोधात शनिवारी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवासी संघटनांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे.

मुंबई ते ठाणे या पहिल्या रेल्वेला 164 वर्ष पूर्ण झाली आहेत. ही रेल्वे गाडी 33 किलोमीटर अंतर धावली होती. चार डब्यांची ही गाडी ठाण्यासाठी ऐतिहासिक ठरली आहे. त्या रेल्वेचे इंजिन ठाणे स्थानकात आठवण म्हणून ठेवावे, अशी मागणी गेली अनेक वर्षे प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधी करत आहेत.

रेल्वे प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार केला जात आहे. मात्र अजूनही रेल्वे प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या विरोधात सह्यांची मोहीम सुरू केली. या मोहिमेला प्रवाशांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा