Advertisement

आजपासून करा सुसाट प्रवास! चारचाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक

रस्त्यांवर धावणाऱ्या चारचाकी वाहनांना आजपासून ‘फास्ट टॅग’ बंधनकारक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे रांगेत थांबून टोल भरण्याचा वेळ वाचून वाहनचालकांना सुसाट प्रवास करता येणार आहे.

आजपासून करा सुसाट प्रवास! चारचाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक
SHARES

टोलनाक्यांवर लागणाऱ्या लांबलचक रांगा आणि सुट्ट्या पैशांवरून होणारी सततची भांडणं, हे चित्र महामार्गांवरून प्रवास करताना नेहमीच दृष्टीस पडतं. पण आता चारचाकी वाहनांना टोल भरण्यासाठी रांगेत उभं राहण्याची गरज भासणार नाही. रस्त्यांवर धावणाऱ्या चारचाकी वाहनांना आजपासून ‘फास्ट टॅग’ बंधनकारक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे रांगेत थांबून टोल भरण्याचा वेळ वाचून वाहनचालकांना सुसाट प्रवास करता येणार आहे. 


‘फास्ट टॅग’ कशासाठी ?

टोलनाक्यांवर लागणाऱ्या लांबलचक रांगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी केंद्र सरकारने ‘फास्ट टॅग’ ही सुविधा उपलब्ध केली आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील ३७० टोलनाक्यांवर ही सुविधा उपलब्ध असून कॉमन सर्विस सेंटरवर (सीसीसी) ‘फास्ट टॅग’ स्टीकर उपलब्ध होणार आहेत. कसं काम करणार?

हे स्टीकर गाडीच्या पुढील भागावर चिकटवणं गरजेचं आहे. या स्टीकरमध्ये चिप टाकण्यात आली असून गाडी जेव्हा टोलनाक्यावर पोहोचेल, त्यावेळी तिथं बसविण्यात आलेले स्कॅनर हे ‘फास्ट टॅग’ स्टिकर स्कॅन करतील आणि त्यात जमा असलेल्या रकमेतून टोलचे पैसे कापले जातील. पैसे कापल्यानंतरच बॅरियर उघडतील. या ‘फास्ट टॅग’ स्टीकरमध्ये पैसे नसतील, तर बॅरियर उघडणार नाहीत. वाहनधारकांना केव्हाही, कधीही हे 'फास्ट टॅग' स्टीकर रिचार्ज करता येईल.काय आहे ‘फास्ट टॅग’?

‘फास्ट टॅग’ ही भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टिम आहे, जी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत संचालित केली जाते. त्यातील रेडियो फ्रीक्वन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानाद्वारे तुमच्या लिंक असलेल्या प्रीपेड किंवा बचत खात्यातून थेट टोल भरणा केला जाईल. 


मिळेल ७.५ कॅशबॅक

हा टॅग विकत घेतल्यानंतर तो कारच्या पुढील दर्शनीय भागावर चिटकवण्यात येतो. त्यानंतर टोलनाक्यावर कोणताही व्यवहार करण्यासाठी थांबण्याची गरज भासणार नाही. टोलनाक्यांवरील वर्दळ कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘फास्ट टॅग’ वापरणाऱ्यांना ७.५ टक्के कॅशबॅक ऑफरही देण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा