Advertisement

मुंबईत फास्टॅगची सक्ती महिनाभर लांबणीवर

देशभरात १५ फेब्रुवारीपासून सर्वच महामार्गांवर फास्टॅगची सक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅगला पुन्हा मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे.

मुंबईत फास्टॅगची सक्ती महिनाभर लांबणीवर
SHARES

देशभरात १५ फेब्रुवारीपासून सर्वच महामार्गांवर फास्टॅगची सक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅगला पुन्हा मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे वाहनावर फास्टॅग स्टिकर नसेल तर दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे. मात्र, मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या वेशींवर फास्टॅग सक्ती महिन्याभरानंतर करण्यात येणार आहे. 

टोलनाक्यांवर वाहनांच्या मोठय़ा रांगा लागतात. टोल रोख रकमेत देताना वेळ जातो. त्यामुळे वाहनांची गर्दी टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने ‘वन नेशन, वन फास्टॅग’ धोरण लागू केले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील ४७ टोलनाके, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील मुंबई-पुणे महामार्ग आणि द्रुतगती मार्ग येथे फास्टॅग बंधनकारक असेल. 

मुंबईच्या वेशीवरील पाचही टोल नाक्यांवर फास्टॅग यंत्रणा उभारण्याचे काम सुरू असून, पुढील महिनाभरात तेथेदेखील फास्टॅगची १०० टक्के अंमलबजावणी होऊ शकेल.  देशात टॅगच्या वापराचे प्रमाण साधारण ८० टक्के असून महाराष्ट्रात ते ७० ते ७५ टक्के  आहे. मात्र,१५ फेब्रुवारीपासून ज्या वाहनांवर फास्टॅग नसेल त्यांना दुप्पट टोल द्यावा लागणार आहे.  

फास्टॅगच्या अंमलबजावणीसाठी टोलनाक्यांवर मार्शलची नियुक्त केली जाणार आहेत.  वाहनावर टॅग नसल्यास मार्शल चालकास टोल नाक्यावरील टॅग विक्रीच्या ठिकाणी घेऊन जातील आणि टॅग बसवण्यास सांगतील.



हेही वाचा -

महापालिका, बेस्ट कर्मचाऱ्यांना तिसरी संधी

लसीकरणासाठी २० खासगी रुग्णालयांना परवानगी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा