Advertisement

FASTag लावलात का? प्रजासत्ताक दिनापासून १०० टक्के अंमलबजावणी

राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) आणि यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai Pune Express Way) पथकर नाक्याच्या सर्व मार्गिकांवर fastag ची अमलबजावणी सुरू...

FASTag लावलात का? प्रजासत्ताक दिनापासून १०० टक्के अंमलबजावणी
SHARES

वेगवान आणि कॅशलेस प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) आणि यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai Pune Express Way) पथकर नाक्याच्या सर्व मार्गिकांवर २६ जानेवारीपासून १०० टक्के फास्टॅग (FASTag) प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे.

फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढण्यासाठी महामंडळानं ११ जानेवारी २०२१ पासून वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर कार, जीप आणि एसयुव्ही फास्टॅग वाहनधारकांना प्रत्येक फेरीला ५ टक्के कॅशबॅक देण्यात येत आहे. या कॅशबॅकच्या माध्यमातून फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढल्याचं दिसून आलं आहे. फास्टॅगच्या १०० टक्के अंमलबजावणीच्या दृष्टीनं महामंडळानं हा निर्णय घेतला आहे.

२६ जानेवारी २०२१ पासून वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील सर्व मार्गिका फास्टॅग प्रणालीनं सज्ज असतील. ‘या दोन्ही मार्गाच्या पथकर नाक्यांवर उद्यापासून फास्टॅग धारक वाहनांना प्राधान्य राहील. मर्यादित कालावधीसाठी काही लेन हायब्रीड लेन असतील.

लेनमध्ये फास्टॅग नसलेले वाहनधारक रोख रक्कमेचा भरणा करू शकतात. पण त्यांना पथकर नाक्याजवळील स्टॉलवरुन फास्टॅग विकत घेऊन गाडीवर लावावा लागेल. फास्टॅग मार्गिकेमध्ये विना फास्टॅग अथवा ब्लॅकलिस्टेड टॅग असलेल्या वाहनांनी प्रवेश केल्यास दुप्पट पथकर फी भरावी लागणार आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा