Advertisement

अखेर १० महिन्यांनंतर मुंबईच्या वेशींवर फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित


अखेर १० महिन्यांनंतर मुंबईच्या वेशींवर फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित
SHARES

मुंबईत (mumbai) प्रवेश करण्यासाठी दहिसर (पश्चिम द्रुतगती मार्ग), मुलुंड (लालबहादूर शास्त्री मार्ग), मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), ऐरोली (मुलुंड-ऐरोली मार्ग) आणि वाशी (शीव-पनवेल मार्ग) या पाच ठिकाणी टोल नाके (toll naka) आहेत. या पाचही ठिकाणी १ जानेवारी २०२० पासून फास्टॅग यंत्रणा (fastag) बसविण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिले होते. मात्र ही यंत्रणा कार्यरत होण्यासाठी अधिक काळ लागला. तब्बल १० महिने लागले असून मुंबईच्या वेशींवर मर्यादित स्वरूपात फास्टॅग यंत्रणा अखेर कार्यान्वित करण्यात आली. 

मागील काही दिवसांपूर्वी दहिसर टोल नाका सोडून इतर सर्व नाक्यांवर ही यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. फास्टॅग ही यंत्रणा सर्व महामार्गांवर कार्यरत करणे गेल्या वर्षी बंधनकारक करण्यात आले. त्यानंतर एमएसआरडीसीने आपणहून पुढाकार घेत मुंबईच्या वेशीवर ही यंत्रणा बसविण्याचे आदेश पथकर कंत्राटदारास दिल होते.

अखेर १० महिन्यांनी ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, सध्या टोल नाक्यावर मर्यादित मार्गिकांनाच फास्टॅग असले तरी लवकरच इतर मार्गिकांवरदेखील ही यंत्रणा कार्यरत होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा