Advertisement

पश्चिम रेल्वेवरील 'या' लोकल, मेल- एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यानच्या पुल क्रमांक ४६ च्या पुनर्गर्भीकरणाच्या कामासाठी अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर अप आणि डाऊन हार्बर मार्गावर १४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील 'या' लोकल, मेल- एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल
(File Image)
SHARES

पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकांदरम्यान पुलाचे गर्डर टाकण्यासाठी १४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री १२ पासून रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या अप- डाऊन दोन्ही मार्गावर असेल. त्यामुळे अनेक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या असून मेल- एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यानच्या पुल क्रमांक ४६ च्या पुनर्गर्भीकरणाच्या कामासाठी अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर अप आणि डाऊन हार्बर मार्गावर १४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  • ब्लॉकमुळे अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील सर्व अप-डाऊन लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
  • जलद मार्गावरील लोकलला फलाट उपलब्ध नसल्यामुळे लोकल राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत.
  • ब्लॉक कालावधी मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सर्व लोकल फक्त वांद्रे स्थानकापर्यंत धावणार आहेत.
  • चर्चगेट – बोरिवलीच्या काही धीम्या लोकल अंधेरीपर्यंत धावणार असून तेथूनच चर्चगेटकरिता चालवण्यात येणार आहेत.
  • हार्बर मार्गावरील दुपारी १.५२ सीएसएमटी – गोरेगाव लोकल, सकाळी १०.३७ ची पनवेल– गोरेगाव लोकल, दुपारी १२.५३ ची गोरेगाव- सीएसएमटी लोकल, दुपारी १२.१४ ची गोरेगाव – पनवेल लोकल रद्द करण्यात येणार आहे.
  • चर्चगेट-बोरिवली लोकल चर्चगेटवरून सुटणारी दुपारी १२.१६ आणि दुपारी २.५० वाजताची चर्चगेट-बोरिवली लोकल विरारपर्यंत धावेल.
  • बोरिवलीवरून दुपारी १.१४ आणि दुपारी ३. ४० वाजता सुटणारी बोरिवली-चर्चगेट लोकल रद्द करण्यात येणार आहे.
  • त्याऐवजी विरार ते चर्चगेट दुपारी १.४५ आणि दुपारी ४.१५ वाजता दोन अतिरिक्त जलद लोकल धावतील.
  • ब्लॉकदरम्यान अप- डाऊन मार्गावरील मेल- एक्सप्रेस गाड्या १० ते १५ मिनिटे विलंबाने धावतील.

याबाबतची सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी ही विनंती.


हेही वाचा

मुंबई मेट्रो पावसासाठी सज्ज, हेल्पलाईन नंबर ते कंट्रोल रूम कार्यान्वित

कोकण रेल्वे पावसाळ्यात सज्ज

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा