Advertisement

मुंबईकरांना मोठा दिलासा, सीएनजीच्या दरात मोठी कपात

महानगर गॅसने (Mahanagar Gas) याबाबतची माहिती दिली आहे.

मुंबईकरांना मोठा दिलासा, सीएनजीच्या दरात मोठी कपात
SHARES

मुंबईकरांना महानगर गॅसने मोठा दिलासा दिला आहे. आज मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात (CNG Price ) प्रतिकिलो 2.50 रुपयांची कपात होणार आहे. महानगर गॅसने (Mahanagar Gas) याबाबतची माहिती दिली आहे.

मुंबई आणि आसपासच्या शहरात सीएनजीच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एक किलो सीएनजीसाठी आता अडीच रुपये कमी मोजावे लागणार. आज मध्यरात्रीपासून नवीन किंमती नुसार 87 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीचे दर हे 44 टक्क्यांनी स्वस्त असल्याचा दावा महानगर गॅसने केला आहे.

मुंबई आणि जवळील परिसरात महानगर गॅस लिमिटेड ही कंपनी प्रमुख सीएनजी, पीएनजी गॅस वितरक आहे. त्यामुळे सीएनजी गॅसच्या दर कपातीचा मोठा फायदा कार चालकांपासून ते रिक्षा चालकांनादेखील होणार आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे अनेकांचे बजेट बिघडले होते. या दरकपातीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

सीएनजीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे, सीएनजी वाहनांच्या वापरामुळे ग्राहकांची पेट्रोल-डिझेलच्या तुलनेन खर्चात जास्त बचत होत नाही. सीएनजी आणि पेट्रोल-डिझेलच्या दरात फारसा फरक राहिला नव्हता. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी होती. त्याच्या परिणामी चालू आर्थिक वर्षात व्यावसायिक वाहनांमध्ये सीएनजीचा वापर कमी झाला असल्याचे समोर आले होते.



हेही वाचा

mumbai"="" target="_blank">Mumbai Metro : डहाणूकरवाडीऐवजी 'या' दोन मेट्रो आता दहिसर पूर्वेपर्यंत धावणार">Mumbai Metro : डहाणूकरवाडीऐवजी 'या' दोन मेट्रो आता दहिसर पूर्वेपर्यंत धावणार

लवकरच मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर मार्गावर धावणार वंदे भारत ट्रेन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा