Advertisement

'उडाण' ठप्प! कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ३ दिवसांपासून बंद

कोल्हापूर ते मुंबई ही विमानसेवा गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होत अाहेत. तांत्रिक अडचण असल्यानं विमानसेवा बंद करण्यात अाल्याचं सांगण्यात येत अाहे.

'उडाण' ठप्प! कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ३ दिवसांपासून बंद
SHARES

केंद्र सरकारच्या उडाण योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली कोल्हापूर ते मुंबई ही विमानसेवा गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होत अाहेत. तांत्रिक अडचण असल्यानं विमानसेवा बंद करण्यात अाल्याचं सांगण्यात येत अाहे. याचबरोबर नाशिक-पुणे, नाशिक-मुंबई आणि जळगाव-मुंबई ही विमानसेवाही बंद अाहे. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.


एअर डेक्कनला इशारा

एअर डेक्कन कंपनीकडून कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा दिली जाते. १५ दिवसांत सेवा पुन्हा सुरू झाली नाही, तर या कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकू, अशा इशारा कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडीक यांनी दिला आहे. एअर डेक्कनने विमानसेवा सुरू न केल्यास इंडिगो कंपनीची शिफारस करून त्यांना सेवा सुरू करण्यासाठी मदत करू, असं महाडीक यांनी सांगितलं.  

उडाण योजनेअंतर्गत यावर्षी एप्रिल महिन्यात कोल्हापूर-मुंबई आणि मुंबई-कोल्हापूर अशी विमानसेवा एअर डेक्कन कंपनीने सुरू केली. मात्र, ही सेवा अचानक बंद केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी अाहे.  



हेही वाचा - 

बँकांचे कर्ज फेडण्यास विजय माल्या तयार



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा