दोन हजारांच्या पैजेसाठी हजारोंच्या जिवाशी खेळ

  Diva
  दोन हजारांच्या पैजेसाठी हजारोंच्या जिवाशी खेळ
  मुंबई  -  

  दोन हजार रुपयांच्या पैजेसाठी दिवा रेल्वे स्थानकाजवळ 15 फुटी रुळ ठेवल्याची धक्कादायक कबुली अटक केलेल्या आरोपींनी दिल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली. दिवा रेल्वे स्थानकाजवळ संशयास्पद अवस्थेत आढळलेल्या रुळ प्रकरणी पाच आरोपींना गुरूवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता हे धक्कादायक वास्तव समोर आले. यामध्ये मुंब्र्यातील मौला मकानदार हा मुख्य आरोपी असल्याचीही माहिती मिळाली आहे. हे पाचही आरोपी गर्दुल्ले असल्याचे सांगितले जात आहे.

  दानिश अकबर शेख, सूरज दिनेश भोसले, मोहब्बत नसीम शेख, नजीर सय्यद आणि जयेश पारे अशी अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींची नावं आहेत. या आरोपींकडून गाड्या पंक्चर करण्याचं सामान ताब्यात घेण्यात आलं आहे.

  दिवा रेल्वे स्थानकाजवळ कोकण रेल्वे मार्गावर 25 जानेवारीला 15 फुटी रुळाचा तुकडा ठेवण्यात आला होता. मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसच्या लोको पायलट हिरेंद्र कुमार आणि असिस्टंट लोकल पायलट हितेश चिंचोळे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला होता.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.