Advertisement

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांचा राजीनामा

कर्ज थकितापोटी कर्मचारी, वैमानिकांचे वेतन वेळेवर देऊ शकत नसलेल्या जेट एअरवेजच्या संचालक मंडळातून राजीनामा देण्याची सूचना स्टेट बँकेने प्रवर्तक नरेश गोयल तसेच त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना केली होती.

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांचा राजीनामा
SHARES

जेट एअरवेज कंपनीचे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांनी जेट एअरवेजच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. सध्या कर्जात वाढ झाल्यानं कंपनीला कर्मचाऱ्यांचा पगार देणंही मुश्कील झालं आहे. नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांनी २५ वर्षांपूर्वी जेट एअरवेजची स्थापना केली होती. गोयल यांनी राजीनामा दिल्यानं कंपनीचे सीईओ विनय दुबे यांच्यावर जेटची जबाबदारी आली आहे. आर्थिक संकटातून कंपनीला मुक्त करण्याचं आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. नरेश गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर आपल्या कर्मचाऱ्यांना भावनिक पत्रदेखील लिहीलं आहे. या पत्रात त्यांनी कंपनीच्या भल्यासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी असल्याचं नमूद केलं आहे. 


४० विमाने जमिनीवरच

कर्ज थकितापोटी कर्मचारी, वैमानिकांचे वेतन वेळेवर देऊ शकत नसलेल्या जेट एअरवेजच्या संचालक मंडळातून राजीनामा देण्याची सूचना स्टेट बँकेने प्रवर्तक नरेश गोयल तसेच त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना केली होती. कर्जाच्या विळख्यात अडकल्यानं जेटला नियमित उड्डाणे चालू ठेवण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. त्याशिवाय, वैमानिक, पुरवठादार, बँका आणि कर्मचाऱ्यांचे पगार, हप्ते वेळेवर देणं जेटसाठी अवघड बनलं आहे. सद्यस्थितीत जेटची ४० विमाने जमिनीवरच उभी आहेत. 


८ हजार कोटींचं कर्ज

जेट एअरवेजवर सध्या २६ बँकांचं ८ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. यामध्ये खासगी आणि परदेशी बँकांचा समावेश आहे. कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, इंडियन ओवरसीज बँक, अलाहाबाद बँक या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून जेटला कर्ज देण्यात आलं होतं. 



हेही वाचा -

पीएनबी, एसबीआय जेट एअरवेजला तारणार, देणार आपत्कालीन कर्ज

EXCLUSIVE : सात सिनेमांच्या सप्तरंगांसह 'भरत आला परत'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा