Advertisement

आता फक्त १८ सेकंदात मिळवा लोकल ट्रेनची तिकीट


आता फक्त १८ सेकंदात मिळवा लोकल ट्रेनची तिकीट
SHARES

मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सोपा होणार आहे. कारण प्रवाशांना आता मोबाईलद्वारे फक्त लोकल ट्रेनच्या तिकिटाचं बुकिंगच नाही, तर १८ सेकंदात त्याचा प्रिंटआऊटही काढता येणार आहे. यामुळे आता प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या तिकीट काऊंटसमोर रांग लावून ताटकळत उभं राहण्याची गरज पडणार नाही. 



यासाठी रेल्वेचा हा निर्णय

उपनगरीय रेल्वे स्टेशनच्या बाहेर ५० वॉल माऊंटेड कियोस्क (तिकट प्रिटिंग मशीन) बसवण्यात आल्या आहेत. यामुळे मोबाईलमध्ये अपलोड केलेल्या यूटीएस अॅपद्वारे बुक केलेल्या लोकल ट्रेनच्या तिकिटाची प्रिंट वॉल माऊंटेड कियोस्क या प्रिंटिंग मशीनमधून काढता येणार आहे. रेल्वे स्टेशनवरील तिकीट काऊंटरसमोर लागणारी रांग कमी करण्यासाठी रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे.


मध्य, पश्चिम रेल्वेवर २५ वॉल माऊंटेड कियोस्क बसवले

रेल्वे माहिती प्रणाली केंद्र (सीआरआयएस) चे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरआयएसने असे २५ वॉल माऊंटेड कियोस्क मध्य आणि पश्चिम रेल्वेवर बसवले आहेत.

एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'प्रवाशांना या अॅपच्या मदतीने सिझन तिकिटाबरोबरच सर्व प्रकारच्या लोकल ट्रेनची तिकिटं तर बुक करता येणार आहेच, शिवाय या मशिनीच्या मदतीने फक्त १८ सेकंदात प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा