Advertisement

जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात ८२ टक्के प्रवासी घट


जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात ८२ टक्के प्रवासी घट
SHARES

द इंटरनँशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशननं (आयएटीए) जागतिक हवाई वाहतूक क्षेत्राबाबतचा अहवाल स्पष्ट केला आहे. या अहवालानुसार, जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात जून २०१९च्या तुलनेत ८२ टक्के प्रवासी घट झाली झाली आहे. तसंच, पुढील ६ महिने ३६ टक्के प्रवाशांचा प्रवास टाळण्याचा मनोदय असल्याचं सर्व्हेक्षणात समोर आले आहे. यंदा जगभरातील विविध हवाई वाहतूक कंपन्यांना ८४.३ बिलीयन अमेरिकन डॉलर्सचा तोटा होण्याची शक्यता आयएटीएनं वर्तवली आहे.

या पार्श्वभूमीवर हवाई वाहतूक क्षेत्राला सरकारी मदत मिळणं गरजेचं असून अन्यथा हे क्षेत्र कोलमडून पडण्याची भीती  व्यक्त करण्यात आली आहे. सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत विमान कंपन्यांसाठी जीवनवाहिनी ठरणार आहे. अवघ्या ४५ टक्के प्रवाशांनी पुढच्या काही महिन्यात विमान प्रवास करण्याची इच्छा प्रदर्शित केली. तर ३६ टक्के प्रवाशांनी पुढील ६ महिन्यापर्यंत विमान प्रवास टाळण्याचा सूर आळवला आहे.

यापूर्वी एप्रिल महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात केवळ २१ टक्के प्रवाशांनी पुढील सहा महिने विमान प्रवास टाळण्याचा निर्धार केला होता व ६१ टक्के प्रवाशांनी पुढील काही महिन्यात विमान प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, जून २०१९ च्या तुलनेत जगभरातील विविध हवाई कंपन्याकडील आकडेवारीनुसार हवाई प्रवासाच्या आरक्षणात तब्बल ८२ टक्के घट झाली आहे.

नोव्हेंबर २०२० च्या पहिल्या आठवड्याच्या तिकीट आरक्षणात देखील नेहमीच्या तुलनेत ५९ टक्के घट झाली आहे. साधारणत: १४ टक्के विमान तिकीटं प्रवासाच्या २२ आठवडे अगोदर विक्री होतात. मात्र, सध्या १-७ नोव्हेंबर या कालावधीसाठी केवळ ५ टक्के विमान तिकीटं आरक्षित करण्यात आली आहेत.



हेही वाचा -

Coronavirus Updates: मुंबईतील मृत्यूदर तब्बल ५.२७ टक्क्यांवर

यंदा मुंबईकरांच्या पाणीपट्टीत होणार वाढ?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा