Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

यंदा मुंबईकरांच्या पाणीपट्टीत होणार वाढ?

येत्या काळात मुंबईकरांना पाणीपट्टी वाढीला देखील सामोरं जावं लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदा मुंबईकरांच्या पाणीपट्टीत होणार वाढ?
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसर राज्याभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं अनेक उद्योगधंद्यांना टाळं लागलं होतं. त्यामुळं अनेकांना आर्थिक नुकसाना सामोरं जावं लागलं. यामुळं अनेकांना नुकसान भरपाई करतेवेळी खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असून, त्रासात भर म्हणजे येत्या काळात मुंबईकरांना पाणीपट्टी वाढीला देखील सामोरं जावं लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरवर्षी जूनमध्ये पाणीपट्टीत काही टक्क्यांनी वाढ होत असते. यावर्षी ही वाढ होणार का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून एक-दोन दिवसात त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पालिकेला येत असलेल्या खर्चाच्या तुलनेत मुंबईकरांना पाणीपट्टी आकारली जाते.

जल अभियंता खात्याचा आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च, जलवाहिन्यांच्या देखभालीचा खर्च, विजेचा खर्च, शासकीय धरणातून उपसा केलेल्या पाण्याची पाणीपट्टी यांच्या एकत्रित खर्चात दरवर्षी वाढ होत असते. त्यावाढीच्या तुलनेत पाणीपट्टीत दरवर्षी जास्तीत जास्त ८ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा ठराव २०१२ मध्ये स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार दरवर्षी जून महिन्यात काही टक्के वाढ केली जाते. 

यावर्षी ही वाढ होणार की नाही किंवा दरवाढ झाली तर किती टक्के होईल याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. महापालिकेनं पाणीपट्टी दरवाढ केल्यास त्याचा सर्वात मोठा फटका उद्योगधंदे, कारखाने, बांधकामं यांना बसणार आहे.


पाण्याचे दर 

प्रकार
जुने दर (रुपये)
घरगुती ग्राहक
३.९१
झोपडपट्टीतील ग्राहक
४.३३
इमारतीतील घरगुती ग्राहक
५.२२
बिगर व्यावसायिक संस्था
२०.९१
व्यावसायिक संस्था
३९.२०
उद्योग, कारखाने इ.
५२.२५
रेसकोर्स, तारांकित हॉटेल
७८.८९
शीतपेये, बाटलीबंद पाणी उत्पादक
१०८.८९

                                  

 आतापर्यंतची दरवाढ

वर्ष
टक्के
२०१३-१४ 

८ टक्के

२०१४-१५
दरवाढ नाही
२०१५-१६
८ टक्के
२०१६-१७
दरवाढ नाही
२०१७-१८
५.३९ टक्के
२०१९-२० 
२.४८ टक्के

  


हेही वाचा -

मुंबईनजीकच्या ‘या’ शहरात पुढचे १५ दिवस कडक लाॅकडाऊन

एमपीएससी परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीरसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा