गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2023) कोकणात (Kokoan) जाण्यासाठी प्रत्येक चाकरमानी हा आतुर असतो. भाजपाने (BJP) कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खुशखबर दिली आहे.
भाजपा मुंबईतून (Mumbai) 6 ट्रेन आणि 250 बस सोडणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी अशा तीन दिवशी भाजपा मुंबईतून ट्रेन आणि बसेस सोडणार आहे.
शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रवाशांना आता मोफत प्रवास करता येणार आहे.
यासोबतच मुंबई भाजपच्यावतीने मोदी एक्स्प्रेस ही विशेष गाडी देखील सोडण्यात येणार आहे. 17 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता दादर सावंतवाडी एक्सप्रेस सुटणार आहे. ही गाडी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली तसेच सावंतवाडी या स्थानकांवर थांबणार आहे. मोदी एक्स्प्रेसचा खर्च भाजपा मुंबईकडून उचलला जाणार आहे.
दरम्यान, यावर्षी मध्य रेल्वेने गणपती विशेष गाड्यांच्या 226 फेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यापैकी फक्त 2 रेल्वेगाड्यांमध्ये तृतीय श्रेणी वातानुकूलित आणि द्वितीय श्रेणी वातानूकूलित डबे आहेत. तर, काही रेल्वेगाड्या अनारक्षित आणि काही विनावातानुकूलित डबे आहेत.