Advertisement

मालगाडीचं इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत


मालगाडीचं इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
SHARES

बदलापूर-अंबरनाथ स्थानकादरम्यान सकाळी ११ वाजेच्या सुमारास मालगाडी बंद पडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ऐन गर्दीच्या वेळेस खोळंबली. तब्बल २ तासानंतर मालगाडीचं बंद पडलेलं इंजिन हटवल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. मात्र या प्रकारामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.


कधी घडली घटना?

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज (सीएसएमटी) टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या मालगाडीचं इंजिन तांत्रिक कारणाने बंद पडल्याने अप धिम्या मार्गावरील वाहतूक कोलमडली. यामुळे बदलापूरहून 'सीएसएमटी'कडे येणाऱ्या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. अनेक चाकरमान्यांना यामुळे कार्यालयात पोहोचण्यास उशीर झाला.

मध्य रेल्वेच्या तंत्रज्ञानी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मालगाडीचं बंद पडलेलं इंजिन डब्यापासून वेगळं करून ट्रॅकवरून हटवलं. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा