Advertisement

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील बंदी २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवली

कोरोनामुळे भारतात २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पण वंदे भारत मोहिमेअंतर्गत काही खास उड्डाणांनाच परवानगी देण्यात आली होती.

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील बंदी २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवली
SHARES

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील बंदी आता २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.त्यामुळे भारतातून परदेशात जाण्यासाठी आणखी एक महिना वाट पाहावी लागणार आहे. 

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान उड्डाणांवरील बंदी २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवल्याचं डीजीसीएने सांगितलं आहे. डीजीसीएने जारी केलेल्या परिपत्रात म्हटलं आहे की, प्रतिबंध असले तरी काही विशिष्ट प्रकरणात काही निवडक मार्गांवर आंतरराष्ट्रीय शेड्यूल्ड फ्लाइट्सना मंजुरी दिली जाऊ शकते.

कोरोनामुळे भारतात २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पण वंदे भारत मोहिमेअंतर्गत काही खास उड्डाणांनाच परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर जुलै महिन्यात निवडक देशांसोबत दोन पक्षीय एअर बबल करारानुसार विमान उड्डाणं करण्यात आली होती. भारताने अमेरिका, ब्रिटन, यूएई, भूतान आणि फ्रान्ससह २४ देशांसोबत एअर बबल करार केला आहे. या करारानुसार दोन्ही देशांमध्ये विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणं त्यांच्या एअरलाईन्सकडून संचलित केले जाऊ शकतात.

देशात २५ मार्च रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याआधी २३ मार्च पासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. ही बंदी २९ मार्चपर्यंत होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढल्याने लॉकडाऊनचा कालावधीही वाढला होता. त्यामुळे विमानांच्या उड्डाणालाही बंदी घालण्यात आली होती.हेही वाचा -

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस १४ फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत

महाराष्ट्र - कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत वाढRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा