Advertisement

हार्बर रेल्वेचा बोरिवलीपर्यंत विस्तार 'या'वर्षी होणार

हार्बर रेल्वेचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे

हार्बर रेल्वेचा बोरिवलीपर्यंत विस्तार 'या'वर्षी होणार
SHARES

हार्बर लोकल ट्रेननं प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हार्बर लोकलचा विस्तार करण्यात येणार आहे. आतापर्यंत हार्बर लोकल अंधेरी ते गोरेगावपर्यंत धावत होती. आता ती थेट बोरिवलीपर्यंत धावणार आहे. हार्बर लोकलचा विस्तार लवकरच बोरिवलीपर्यंत होणार आहे.

२०२५ पर्यंत हार्बर रेल्वेचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. नवी मुंबई आणि मुंबईला जोडणाऱ्या जुन्या रेल्वे मार्गाचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे.

सध्या हार्बर लोकल रेल्वे सीएसएमटी ते गोरेगाव किंवा पनवेल ते गोरेगाव दरम्यान धावते. आता या प्रकल्पाचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याची योजना आहे.

नवी मुंबईला पश्चिम रेल्वेशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. आता तो बोरिवलीपर्यंत वाढवण्याचे काम सुरू होणार आहे.

२०२५ पर्यंत हार्बर रेल्वेचा बोरिवलीपर्यंत विस्तार केला जाईल. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या बंदरातून थेट प्रवास करणं शक्य होणार आहे.

७ किमी विस्तारासाठी ७४५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. आता त्याचा बोरिवलीपर्यंत विस्तार करून, मालाडभोवती ३ किमीचा कॉरिडॉर तयार केला जाईल. काही ठिकाणी रेल्वेच्या जागेअभावी उन्नत मार्ग केले जाणार आहेत.



हेही वाचा

पुणे-शिर्डी-नागपूर विमानसेवा शुक्रवारपासून सुरू

पुढील महिन्यापासून 'मेट्रो 2 अ' आणि 'मेट्रो 7' धावण्याची शक्यता

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा