Advertisement

मुंबई ते पुणे प्रवास आता ४० मिनिटांत, जाणून घ्या, कसा?

जवळपास ४० मिनिटांत पुणे ते मुंबई असा प्रवास करता येणार आहे.

मुंबई ते पुणे प्रवास आता ४० मिनिटांत, जाणून घ्या, कसा?
SHARES

पुणे विमानतळावरील व्यावसायिक विमान सेवा १६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान बंद आहे. विमानसेवा बंद झाल्यामुळे आता सणासुदीच्या काळात खाजगी हवाई सेवा (Private air carrier Blade) सुरू करण्याची योजना आखली जात आहे.

खाजगी हेलिकॉप्टर Fly Blade India Pvt Ltd. द्वारे ही सेवा देण्यात येणार आहे. यामुळे जवळपास ४० मिनिटांत पुणे ते मुंबई असा प्रवास करता येणार आहे.

हेलिकॉप्टर सेवा दररोज खर्डी ते जुहू अशी सुरू असेल. पुणे ते मुंबईसाठीचं एका व्यक्तीचं तिकीट १ हजार ५०० रुपये असेल. हेलिकॉप्टर दररोज सकाळी ९.३० वाजता खर्डी आणि जुहूतून संध्याकाळी ४.३० वाजता निघेल. तर मुंबई-पुणे उड्डाण सकाळी १०.३० आणि दुपारी ३.३० वाजता निघेल.

Fly Blade India Pvt Ltd. च्या प्रवक्त्यानं सांगितलं की, “पुण्याबाहेर उड्डाण करणारा एकमेव हवाई सेवा सध्या सुरू आहे. कारण विमानतळ १६ ते २९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत बंद आहे.”

पुणे ते मुंबई दरम्यान Blade ही एकमेव खाजगी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येत आहे. या हेलिकॉप्टर सेवेमुळे पुणे-मुंबई दरम्यान रस्ते प्रवासासाठी लागणारे ५ तास वाचतील.

विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिंया यांनी मागील आठवड्यात पुण्यासाठी हेलिकॉप्टर सेवा घोषित केली होती. विमान वाहतूक मंत्र्यांच्या घोषणेनंतर प्रायव्हेट हेलिकॉप्टर कंपनी Blade India Pvt Ltd. नं पुणे-मुंबई सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

सध्या पुणे आणि मुंबई दरम्यान कोणतीही व्यवसायिक उड्डाणं सुरू नाहीत. त्यामुळे हेलिकॉप्टर सेवा एकमेव हवाई पर्याय आहे. विमानाशिवाय आता जलद प्रवासासाठी हा एक सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे.

एव्हिएशन विश्लेषक आणि एयर इंडिया पुणे स्टेशनचे माजी प्रभारी धैर्यशील वंदेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं, की हा प्रवाशांसाठी एक चांगला पर्याय ठरेल. पुणे आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांसह इतर प्रवाशांसाठीही ही सेवा फायदेशीर ठरेल. यामुळे अनेकांचा मोठ्या प्रमाणात वेळही वाचेल.

दरम्यान, पुणे विमानतळ १६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान धावपट्टीच्या कामासाठी बंद राहणार आहे. कोविशील्ड बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या लसी विमानसेवे मार्फत पोहोचवल्या जात होत्या. त्यामुळे पुणे विमानतळाच्या झावपट्टीचं काम पुढे ढकलण्यात आलं होतं. आता हे काम करत असल्यानं१५ दिवस धावपट्टी पूर्णपणे बंद आहे.



हेही वाचा

पुणे विमानतळ 'या' तारखेपासून १५ दिवस राहणार बंद

१८ ऑक्टोबरपासून विमानसेवा पूर्ण क्षमतेनं चालणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा