Advertisement

पुणे विमानतळ 'या' तारखेपासून १५ दिवस राहणार बंद

पुण्याला विमानानं जाताय? मग त्याआधी ही बातमी नक्की वाचा...

पुणे विमानतळ 'या' तारखेपासून १५ दिवस राहणार बंद
SHARES

पुणे विमानतळ १६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान धावपट्टीच्या कामासाठी बंद राहणार आहे. १६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान बुकींग केलेल्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे. प्रवाशांना बुकींग रद्द करावं लागणार आहे. केवळ दहा दिवसांपूर्वी ही घोषणा केल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

१५ दिवस धावपट्टी पूर्णपणे बंद असल्यानं आता प्रवाशांना मुंबई इथल्या विमानतळावर अवलंबुन रहावं लागणार आहे. गोंधळामुळे आणि येणाऱ्या तारखांची औपचारिक घोषणा न झाल्याने अनेक फ्लायर्स मुंबईहून तिकीट बुक करण्यासाठी पुढे गेले आहेत.

पुणे शहरातील लोहगाव इथल्या हवाई दलाच्या एअर बेसवरूनच व्यावसायिक विमानांचं नियंत्रण केलं जातं. विमानतळाच्या अंतर्गत कामानिमित्त सप्टेंबर २०२० पासून रात्रीचे उड्डाण आणि लँडिंग बंद होते. विमानतळावर रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी रात्रीच्या सर्व प्रकारची विमान उड्डाणं आणि लँडिंगच्या सुविधा बंद ठेवण्यात आल्या होत्या.

जवळपास वर्षभर लोहगाववरून केवळ दिवसाच उड्डाणे होत आहेत. आता ते देखील बंद होणार आहेत. आता १६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान धावपट्टीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे पंधरा दिवसांकरीता प्रवाशांना सेवा बंद राहणार आहे.



हेही वाचा

IRCTC क्रूझ पर्यटनाबाबत सतर्क, NCB नं छापा टाकलेल्या क्रुझशी झाला होता करार

मुंबई विमानतळाचे टर्मिनल १ खुले करण्यास मान्यता

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा