Advertisement

'हायपर लूपने १४ मिनिटांत पोहोचाल मुंबईहून पुण्याला'


'हायपर लूपने १४ मिनिटांत पोहोचाल मुंबईहून पुण्याला'
SHARES

तुम्हाला मुंबईहून पुण्याला लवकरात लवकर किती तासांत पोहोचायचंय २ तासांत, १ तासांत की अर्ध्या तासांत असा खुळचट प्रश्न विचारू नका राव… कारण राज्यात येऊ घातलाय एक नवा सुपरफास्ट वाहतूक पर्याय ज्यानं मुंबई-पुणे हे अंतर अवघ्या १४ मिनिटांत पार करता येऊ शकेल. गोंधळून जाऊ नका, हे खरं आहे. या आधुनिक वाहतूक पर्यायाचं नाव ‘हायपर लूप’ असं आहे. राज्य सरकारने यासंदर्भात अमेरिकेतील ‘व्हर्जिन हायपरलूप वन’ या कंपनीसोबत गुरूवारी सामंजस्य (एमओयू) करार केला आहे.



काय आहे करारात?

'पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अथाॅरिटी' (पीएमआरडीए) सोबत केलेल्या करारानुसार ‘व्हर्जिन हायपरलूप वन’ कंपनी मुंबई-पुणे दरम्यान कुठल्या मार्गावर ‘हायपर लूप’ वाहतूक सेवा सुरू करता येईल? तांत्रिकदृष्ट्या ती सक्षम ठरेल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती आर्थिकदृष्या परवडणारी असेल का? याची चाचपणी करणार आहे. ही चाचपणी पूर्ण झाल्यावर कंपनी आपला अहवाल राज्य सरकारला सादर करेल. त्यानंतर सेवा उभारण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल.



‘हायपरलूप’ कुठे?

अशीच 'हायपरलूप'ची सेवा बंगळुरू ते चेन्नईदरम्यान सुरू करण्यासाठी देखील चाचणी सुरू असून ‘व्हर्जिन हायपरलूप वन’ने कर्नाटक सरकारसोबत देखील करार केला आहे. एवढंच नव्हे, तर जगभरात यूएई, यूएस, कॅनडा, फिनलँड आणि नेदरलँड या देशांमध्येही कंपनीने ही सुपरफास्ट वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे.


काय आहे प्रवासाचं टेक्निक?

सध्या रस्ते मार्गानं मुंबईतून पुण्याला जाण्यासाठी किमान ३ तास तरी लागतात. तर विमानाने मुंबईहून पुण्याला पोहोचायलाही ५० ते ५५ मिनिटं लागतात. याचाच अर्थ हायपरलूपने मुंबईहून पुणं गाठायला सर्वात कमी वेळ (१४ मिनिटं) लागेल. हायपरलूपमध्ये एलिव्हेडेट रेल्वेसारखा उंचीवर मार्ग तयार केलेला असतो. त्यावर मोठी नळी किंवा पाईपमधून प्रचंड दाबाने हवा सोडण्यात येते. जसं आपण एखाद्या नळीतून तोंडाने हवा सोडतो, अगदी त्याचप्रमाणे. या हवेच्या दाबाने प्रतितास ८०० मैल वेगाने प्रवास करात येतो.




सर्वात व्यस्त, वर्दळीच्या मार्गावर ‘हायपर लूप’ चालवणं योग्य ठरू शकेल. मुंबई-पुणे हा मार्ग देशातील सर्वाधिक व्यस्त मार्गांपैकी एक आहे. त्यामुळे ही सेवा चालविण्यासाठी हा मार्ग अगदी योग्य आहे. ही जलदगती सेवा सुरू झाल्यास प्रवासाचा वेळ अवघ्या २० मिनिटांवर येईल. या वाहतूक पर्यायाने दोन्ही शहरं एकमेकांच्या आणखी येऊन देशातील पहिलं 'मेगापोलिस' शहर उदयास येऊ शकेल.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री  



हेही वाचा

मुंबई-पुणे 14 मिनिटांत पोहोचवणारी हायपरलूप आहे तरी काय?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा