पुरावा कुठे आहे? मुंबईकरांचा ट्रॅफिक विभागाला प्रश्न

Mumbai
पुरावा कुठे आहे? मुंबईकरांचा ट्रॅफिक विभागाला प्रश्न
पुरावा कुठे आहे? मुंबईकरांचा ट्रॅफिक विभागाला प्रश्न
पुरावा कुठे आहे? मुंबईकरांचा ट्रॅफिक विभागाला प्रश्न
पुरावा कुठे आहे? मुंबईकरांचा ट्रॅफिक विभागाला प्रश्न
See all
मुंबई  -  

मुंबई पोलिसांचा वाहतूक विभाग सध्या अद्ययावत झाल्याने चांगलाच चर्चेत आला आहे. संपूर्ण शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही नेटवर्कच्या माध्यमातून वाहतूक विभागाने वाहतूक नियमांचे भंग करणा-्या वाहनचालकांकडून कोट्यवधींचा दंड वसूल केला आहे. मात्र या प्रणालीत काही दोष असल्याचं आता समोर आलं आहे. ई चलनाच्या माध्यमातून गुन्ह्याचा दंड तर वसूल केला जातोय पण सोबत फोटोचा पुरावा मिळत नसल्याने मुंबईकरांचा गोंधळ उडताना दिसून येतोय.

ट्रॅफिक पोलिसांची ई चलन यंत्रणा सीसीटीव्ही नेटवर्कच्या माध्यमातून अद्ययावत झाल्याने नियमांचे भंग करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक विभाग थेट मुख्य कार्यालयात बसून दंड ठोठावत आहे. हा दंड तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर ठोठावला जात आहे. सिग्नल तोडल्यास, झेब्रा क्रॉसिंग करणे, फोनवर बोलणे, सीट बेल्ट न लावता गाडी चालवणे, हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे या सगळ्या नियमांचं उल्लंघन केल्याचा दंड शहरातील विविध चौकात लावलेल्या सीसीटीव्ही नेटवर्कच्या माध्यमातून एक फोटो काढून ठोठावण्यात येत आहे. सी लिंक सारख्या ठिकाणी अतिवेगाने गाडी चालवल्यास तिथे लागलेले स्पीड कॅमेरे तुमच्या गाडीचे फोटो काढतात आणि आपोआप दंड आकाराला जातो.

या सगळ्या प्रकरणात मोबइल क्रमांक ट्रॅफिक विभागाकडे नोंदवला असल्यास मेसेज येणे अपेक्षित असते. हा दंड ई चलानद्वारे देखील भरता येतो पण तो भरताना गुन्ह्याच्या संपूर्ण तपशिलासह गुन्ह्याचा पुरावा म्हणजेच फोटो दिसणे अपेक्षित असते, मात्र कित्येकदा ई चलान भरताना पुराव्याचा रकाना(बॉक्स) रिकामाच असल्याचे निदर्शनास आले आहे.

या प्रकरणी वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याशी संपर्क साधला असता "डिसेंबर-जानेवारी दरम्यान सर्व्हर्स ते हे बदलत होते. त्यामुळे अशा तांत्रिक त्रुटी येत आहेत, आमचा विभाग तांत्रिक पुराव्यांशिवाय म्हणजेच फोटोशिवाय कधीच दंड वसूल करत नाही. साइटवर फोटो नसल्यास हेल्पलाइन क्र. 8454999999 वर संपर्क करून मदत मिळेल, अशी माहिती भारंबे यांनी दिली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.