Advertisement

एसटीची स्वच्छतेकडे वाटचाल, रोज १८,५०० बस होणार चकाचक


एसटीची स्वच्छतेकडे वाटचाल, रोज १८,५०० बस होणार चकाचक
SHARES

एसटी महामंडळातर्फे सोमवारपासून संपूर्ण महाराष्ट्रातील बस स्थानक तसेच आगारात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली. या उपक्रमाची सुरूवात कुर्ला, नेहरू नगर एसटी बसस्थानकापासून करण्यात आली. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, शालेय आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि अदित्य ठाकरे इ. उपस्थित होते.


येथे होणार स्वच्छता

गांधी जयंतीच्या निमित्ताने 'संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान' सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत दिवसाला सुमारे १८,५०० बस स्वच्छ केल्या जातील. ५३८ बस स्थानक रोज चकाचक होतील, २५० आगार आणि परिसरांची स्वच्छता होईल, ३५ विभागीय कार्यालये आणि इतर कार्यालये टापटीप राहतील, वाहक-चालक यांचे विश्रांतीगृह स्वच्छ राहील, महिन्याला किटकनाशक फवारणी, पिण्याच्या पाण्याच्या टाक्याची स्वच्छता करण्यात येईल.


कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक

या स्वच्छता कामासाठी मुंबईतील प्रत्येक बस स्थानक तसेच आगारात एका खासगी संस्थेद्वारे कंत्राटावर कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक ठिकाणी किमान ८-१० कर्मचारी असतील, अशी माहिती एसटीद्वारे देण्यात आली.

एसटीतून दररोज ७२ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवास करताना प्रवाशांना अस्वच्छतेचा त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक प्रमुख जिल्ह्यात होईल. प्रवाशांना एक हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल. एखाद्या ठिकाणी अस्वच्छता आढळून आल्यास, प्रवाशांना त्यावर तक्रार नोंदवण्यात येईल. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.हेही वाचा -

एसटी बसस्थानकावर आता दिवाळीच्या फराळाचा 'स्टँड'

दिवाळीत एसटी चाकरमान्यांच्या खिशाला कात्रीडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय