Advertisement

ओमिक्रॉनमुळे 'या' तारखेपर्यंत आतरराष्ट्रीय विमानसेवा बंद

जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) व्हॅरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

ओमिक्रॉनमुळे 'या' तारखेपर्यंत आतरराष्ट्रीय विमानसेवा बंद
SHARES

जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) व्हॅरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारतानं आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर (International Flights) घातलेले निर्बंध आणखी वाढवले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (Director General of Civil Aviation) एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

कोविड-19 च्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानवाहतुकीवरची बंदी आता २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत कायम राहणार असल्याचं या परिपत्रकात म्हटलं आहे.

'डीजीसीए'नं मंजूर केलेल्या फ्लाइट्सनादेखील हा निर्णय लागू नसेल. यासोबतच 'एअर बबल'अंतर्गत (Air Bubble) असलेल्या विमानवाहतुकीवर बंदी घालण्यात येणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. यापूर्वी 'डीजीसीए'नं ३१ जानेवारी २०२२ पर्यंत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर २३ मार्च २०२० पासून भारतातून होणारी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद आहे. तथापि, जुलै २०२० पासून सुमारे २८ देशांसोबत झालेल्या एअर बबल करारांतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू आहे. कोरोना पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत या नियमांचं काटेकोर पालन करावं लागेल, असं सरकारचं म्हणणं आहे.

कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) आणि विमान इंधनाच्या (Fuel) दरात झपाट्यानं होत असलेल्या वाढीमुळे चालू आर्थिक वर्षात विमान कंपन्यांचा तोटा २०,००० कोटी रुपयांपर्यंत वाढू शकतो.

'क्रिसिल'च्या म्हणण्यानुसार, या आर्थिक वर्षात विमान कंपन्यांची वाटचाल २०,००० कोटी रुपयांच्या म्हणजेच आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या निव्वळ तोट्याकडे (Loss) होत आहे.

गेल्या आर्थिक वर्षातल्या १३,८५३ कोटी रुपयांच्या तुलनेत हा तोटा ४४ टक्क्यांनी अधिक आहे. किमान २०२२-२३ पर्यंत तरी विमान कंपन्या यातून सावरू शकत नाहीत, असा इशारा देशांतर्गत विमान वाहतुकीत ७५ टक्के वाटा असणाऱ्या इंडिगो, स्पाइसजेट आणि एअर इंडिया या कंपन्यांवर आधारित अहवालात देण्यात आला आहे.



हेही वाचा

४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान मध्य रेल्वेवर ७२ तासांचा मेगाब्लॉक

रेल्वेत हरवलेलं सामान ‘असं’ मिळवा, रेल्वेचा नवा उपक्रम

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा