Advertisement

तेजस एक्स्प्रेस 'या' तारखेपासून प्रवाशांच्या सेवेत

कोरोनाची लाट ओसरताच आता तेजस एक्स्प्रेस पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे.

तेजस एक्स्प्रेस 'या' तारखेपासून प्रवाशांच्या सेवेत
SHARES

वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आयआरसीटीसीनं मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गावर धावणारी तेजस एक्स्प्रेस एप्रिल २०२१ पासून बंद केली होती. कोरोनाची लाट ओसरताच आता तेजस एक्स्प्रेस ७ ऑगस्टपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे.

टाळेबंदीमुळे बंद केलेली तेजस एक्स्प्रेस पूर्ण क्षमतेनं १४ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू झाली. मात्र मार्च महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात आणि मुंबईतील करोना रुग्णांची संख्या झपाटय़ानं वाढत असल्यानं सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते.

त्यामुळे आयआरसीटीसीनंही २ एप्रिलपासून तेजस एक्स्प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता ७ ऑगस्टपासून गाडी क्रमांक ८२९०२ आणि ८२९०१ तेजस एक्स्प्रेस सुरू होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. ही गाडी शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवारी धावणार आहे.

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेससाठी ट्रेनची तिकिटे www.irctc.co.in किंवा आयआरसीटीसी रेल कनेक्ट अ‍ॅपवर ऑनलाईन बुक करता येतील.

अहवालानुसार ट्रेनला तत्काळ कोटा किंवा प्रीमियम तत्काळ कोटा असणार नाही, फक्त सामान्य कोटा आणि परदेशी पर्यटक कोटा असणार आहेत. त्यात एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये सहा आणि चेअर कारच्या १२ जागा परदेशी पर्यटकांसाठी उपलब्ध असतील.



हेही वाचा

कोकणवासियांसाठी खुशखबर, महामंडळाच्या २ हजार २०० बसेस उपलब्ध होणार

सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या - केशव उपाध्ये

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा