Advertisement

आयआरबीने टोलवसुलीसाठी एमएसआरडीसीला दिले ६,५०० कोटी

‘यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गा’वरील पथकरवसुली (टोल) अधिकारापोटी देय रकमेपैकी ६ हजार ५०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीकडून राज्य सरकारला देण्यात आला.

आयआरबीने टोलवसुलीसाठी एमएसआरडीसीला दिले ६,५०० कोटी
SHARES

‘यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गा’वरील पथकरवसुली (टोल) अधिकारापोटी देय रकमेपैकी ६ हजार ५०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीकडून राज्य सरकारला (IRB infra makes first payment of 6500 crore rupees for mumbai pune expressway deal with msrdc ) देण्यात आला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पथकरवसुलीसाठी २०१९ मध्ये राबवण्यात आलेल्या फेरनिविदा प्रक्रियेनंतर हे काम पुन्हा एकदा एकमेव निविदादार असलेल्या ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीला सोपवण्यात आलं होतं. २०३० पर्यंत ‘आयआरबी’ला मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गाचं काम देण्यात आलं आहे.

१ मार्च २०२० पासून १० वर्षे २ महिन्यांसाठी ‘आयआरबी’ने ८२६२ कोटी रुपये देऊ केले आहेत. त्यानुसार ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनी आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्यात तसा करारही करण्यात आलेला आहे. या करारानुसार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पथकरवसुलीसाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने ६५०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता निश्चित केला होता. त्यानुसार आयआरबीने ६५०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे. तर दुसऱ्या वर्षी ८५० कोटी रुपये, ८५० कोटी रुपये तिसऱ्या वर्षी तर ६२ कोटी रुपये चौथ्या वर्षी असे एकूण ८२६२ कोटी रुपये आरबीआयला द्यायचे आहेत. 

हेही वाचा - लोकलचं सॅनिटायझेशन करण्यात 'मरे' 'परे'पेक्षा एक पाऊल पुढे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमएसआरडीसी आणि राज्य सरकारच्यावतीने मंत्रालयात या रकमेचा औपचारिक स्वीकार केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे), नगरविकास तथा सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर, स्टेट बँक आणि युनियन बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पथकराच्या दरांबाबत १५ वर्षांपूर्वी अधिसूचना काढण्यात आली होती. त्यात दर ३ वर्षांनी पथकराचे दर वाढवण्याची तरतूद आहे. त्यानुसार १ एप्रिल २०२० पासून पुढील ३ वर्षांसाठी दरवाढ अपेक्षित होती. या दरवाढीनुसार एप्रिल २०१७ ते मार्च २०२० पर्यंत कार चालकांसाठी असलेला २३० रुपयांचा दर वाढून २७० रुपये, मिनी बसचालकांना ३५५ रुपयांऐवजी ४२० रुपये, बससाठी ६७५ रुपयांसाठी ७९७ रुपये अपेक्षित होता. त्यातच कोरोना संकट आणि लाॅकडाऊन आल्याने या दरवाढीवर निर्णय झाला नाही.

हेही वाचा - महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष बेस्ट बससेवा बंद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा