Advertisement

प्रवाशांसाठी खूशखबर! आता पिझ्झा मिळणार फक्त 8 मिनिटांत


प्रवाशांसाठी खूशखबर! आता पिझ्झा मिळणार फक्त 8 मिनिटांत
SHARES

लांब पल्ल्यांचा प्रवास करताना भूकेने व्याकूळ झालेल्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. कारण मुंबई सेंट्रल टर्मिनसमध्ये प्रवाशांसाठी खाद्यपदार्थांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय पिझ्झा देखील केवळ आठ मिनिटांत मिळणार आहे.

एक्स्प्रेस, मेल गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची उपासमार होऊ नये म्हणून इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ने व्हेंडिंग मशिनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.


'हे' खाद्यपदार्थ मिळतील

मुंबई सेंट्रल टर्मिनस येथून एक्स्प्रेस गाड्यांतून प्रवास करणाऱ्यां प्रवाशांना खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी (आयआरसीटीसी)ने व्हेंडिंग मशिन उपलब्ध करून दिली आहे. फूड प्लाझा, जनआधार याशिवाय खासगी कंपनीच्या व्हेंडिंग मशिनही येथे बसवण्यात आल्या आहेत. सकाळी सात ते रात्री ११पर्यंत या व्हेंडिंग मशिन सुरू राहतील. यामध्ये पिझ्झा, फ्रेंच फ्राइज, पॉपकॉर्न, आइसक्रीम, ज्यूस याशिवाय राजस्थानी, गुजराती, जैन, मेक्सिकन, चायनीज, थाई इत्यादी खाद्यपदार्थ या मशिनद्वारे उपलब्ध होतील.

या मशिनच्या आधारे प्रवाशांना लवकरात लवकर ही सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचं आयआरसीटीसीचं म्हणणं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा