Advertisement

व्हिडिओ बनवून मिळवा १ लाखाचं बक्षिस, जाणून घ्या आयआरसीटीसीची नवी स्पर्धा

आयआरसीटीसी Vlogers साठी एक विशेष स्पर्धा घेऊन आलीय.

व्हिडिओ बनवून मिळवा १ लाखाचं बक्षिस, जाणून घ्या आयआरसीटीसीची नवी स्पर्धा
SHARES

आयआरसीटीसी Vlogers साठी एक विशेष स्पर्धा घेऊन आलीय. ही स्पर्धा जिंकलेल्यांना बक्षीस देखील देण्यात येणार आहे. आयआरसीटीसी फिरण्याची आवड असलेल्या लोकांना एक लाख रुपयांचे बक्षीस देत आहे. हे एक लाख रुपये मिळवण्यासाठी आपल्याला फक्त एक व्हिडीओ बनवावा लागणार आहे.

या स्पर्धेत भाग घेण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट आहे. आयआरसीटीसी ही स्पर्धा CoRover च्या सहकार्यानं आयोजित करीत आहे. आयआरसीटीसीनं ट्विटद्वारे याबाबत माहिती दिलीय.

आयआरसीटीसीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिलं आहे की, या स्पर्धेत भाग घेण्यासाठी Vlogers ना भारतीय रेल्वे आणि तिकीट, कॅटरिंग, पर्यटन, हवाई, चॅटबॉट आणि पर्यटन स्थळांसारख्या अनेक विषयांवर व्हिडीओ बनवावे लागतील.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी, https://corover.ai/vlog/ या लिंकवर जाऊन स्पर्धक फॉर्म भरू शकतात.

स्पर्धेत प्रथम विजयी झालेल्या स्पर्धकाला एक लाख रुपयांचे बक्षीस तसंच प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देखील देण्यात येणार आहे. दुसर्‍या क्रमांकाच्या स्पर्धकास ५० हजार रुपयांचे प्रमाणपत्र आणि ट्रॉफी आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास २५ हजार रुपयांचे प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त इतर सर्व विजेत्यांना भेट कार्ड आणि ५०० रुपयांचे प्रमाणपत्र दिले जाईल.

या स्पर्धेअंतर्गत सुमारे ३०० विजेत्यांची घोषणा केली जाणार आहे. सर्व राज्यातील लोक यात सहभागी होऊ शकतात. व्हिडीओची गुणवत्ता आणि सामग्री पाहिल्यानंतर विजेता घोषित केला जाईल.

IRCTC CoRover च्या सहकार्यानं ते आयआरसीटीसी आणि महाराजा व्हिडीओंवर अपलोड करावे लागतील. यासह एकदा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर त्याचे आयआरसीटीसीद्वारे कॉपीराइट केले जातील. त्यामध्ये बनवणाऱ्याचे नाव दिले जाईल. त्याच वेळी बनवणारा या व्हिडीओसाठी हक्क सांगू शकत नाही.

आयआरसीटीसी टूरिझम, आयआरसीटीसी एअर, आयआरसीटीसी आयमुद्रा अ‍ॅप आणि वेबसाईट, आयआरसीटीसी ई-कॅटेरिंग, आयआरसीटीसी एसबीआय कार्ड, आयआरसीटीसी नवीन ई-तिकीट वेबसाईट, आयआरसीटीसी बस बुकिंग, आयआरसीटीसी तेजस ट्रेन, सेवानिवृत्त खोली बुकिंग यांसारख्या विषयांवर व्हिडिओ बनवता येईल.हेही वाचा

अर्धवातानुकूलित लोकल प्रवासाला सर्वाधिक प्रवाशांची मान्यता

रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एसटी धावली

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा