Advertisement

IRCTC ची ऑनलाइन तिकिट बुकिंग सेवा 'इतक्या' तासांसाठी बंद

रेल्वेच्या सर्व ऑनलाइन सेवाही बंद राहणार आहेत.

IRCTC ची ऑनलाइन तिकिट बुकिंग सेवा 'इतक्या' तासांसाठी बंद
SHARES

भारतीय रेल्वेतून प्रवास करण्यासाठी IRCTC द्वारे रेल्वे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना मंगळवारी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. IRCTC ने आरक्षण प्रणाली (PRS) २ तासांपेक्षा जास्त काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सेवांवर किती काळ परिणाम होईल

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) मार्फत, प्रवासी मंगळवारी रात्री ११:४५ वाजल्यापासून पुढील अडीच तासांपर्यंत म्हणजे २६ एप्रिलच्या रात्रीपासून २ पर्यंत ऑनलाइन तिकीट काढू शकणार नाहीत.

IRCTC नुसार, तांत्रिक कारणांमुळे, भारतीय रेल्वेद्वारे संचालित संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली बंद राहील. यासोबतच रेल्वेच्या सर्व ऑनलाइन सेवाही बंद राहणार आहेत. ही यंत्रणा अपग्रेड करण्यासाठी सुमारे अडीच तास बंद राहणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कुठल्या सेवा बंद असतील?

या दरम्यान आरक्षण, रद्द करणे, आरक्षण चार्ट बनवणे, चौकशी काउंटर सेवा यासह पीआरएसशी संबंधित इतर सेवा देखील बंद राहतील. विशेष म्हणजे या अडीच तासांमध्ये प्रवाशांना ऑनलाइन आरक्षण करता येणार नाही. यासोबतच ट्रेन आणि पार्सलशी संबंधित कोणतीही माहिती उपलब्ध होणार नाही.

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी रात्री १२ वाजल्यानंतरच्या गाड्यांचे आरक्षण चार्ट वेळेपूर्वी तयार केले जातील. सुमारे तीन तास तिकीट बुकिंग आणि अन्य सेवांवर परिणाम होणार आहे.

भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जाणार्‍या संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली केंद्रांद्वारे बहुतेक लोक ट्रेनमध्ये प्रवास करण्यापूर्वी तिकीट बुक करत असले तरी, तंत्रज्ञानाच्या या युगात, अधिकाधिक लोक वेळेची बचत करण्यासाठी घरी बसून IRCTC वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन तिकिटांचे आरक्षण करतात.

प्रवासी आरक्षण प्रणालीद्वारे, प्रवासी संगणकीकृत अनारक्षित तिकीट प्रणाली केंद्रांमधून सामान्य किंवा अनारक्षित तिकिटे खरेदी करू शकतात. याशिवाय स्थानकांवर बसवण्यात आलेल्या ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीनमधूनही रेल्वे तिकीट बुक करता येणार आहे.

अशा स्थितीत भारतीय रेल्वेनं चालवलेली संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली सुधारणेसाठी किंवा अन्य कामांसाठी बंद ठेवली जाते, तेव्हा लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो.



हेही वाचा

बेस्टचं नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड लाँच, 'असा' करायचा वापर

डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये 'ही' नवी सुविधा सुरू, प्रवाशांसाठी फायदेशीर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा