Advertisement

जेट एअरवेजचा प्रवाशांच्या जीवावर बेतणारा हलगर्जीणा, ३० प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त

जेट एअरवेजच्या केबिन क्रू ने विमानातील हवेचा दाब नियंत्रीत ठेवणारा स्वीच सुरूच न केल्याने विमानातील ३० प्रवाशांच्या नाकातून रक्त यायला लागलं. त्यामुळे या विमानाला काही वेळातच मुंबईत लँड करावं लागलं.

जेट एअरवेजचा प्रवाशांच्या जीवावर बेतणारा हलगर्जीणा, ३० प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त
SHARES

जेट एअरवेजच्या मुंबई-जयपूर विमानातील केबिन क्रूच्या चुकीमुळे प्रवाशांच्या जीवावर बेतणारी घटना घडली. केबिन क्रू ने विमानातील हवेचा दाब नियंत्रीत ठेवणारा स्वीच सुरूच न केल्याने विमानातील ३० प्रवाशांच्या नाकातून रक्त यायला लागलं. त्यामुळे या विमानाला काही वेळातच मुंबईत लँड करावं लागलं. ही घटना घडली तेव्हा या विमानात १६६ प्रवासी होते.


नेमकं काय घडलं?

गुरुवारी सकाळी जेट एअरवेजचं विमान मुंबईतून जयपूरला जाण्यासाठी निघालं होतं. विमानाचं उड्डाण झाल्यावर काही वेळातच प्रवाशांना रक्तदाब, नाका-कानातून रक्तस्त्राव आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे या विमानाचं मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. दरम्यान तपासानंतर या विमानातील कर्मचाऱ्याने केबिनमधील हवेच्या दाबाचा समतोल राहण्यासाठी असलेलं स्वीचच सुरूच केलं नसल्याचं पुढं आलं. त्यामुळे प्रवाशांना हा त्रास जाणवू लागला होता. 


चौकशीचे आदेश

जेट एअरवेजच्या मुंबई जयपूर या विमानातील कर्मचाऱ्याने ऑक्सिजन प्रेशर सुरू होण्यासाठीचं स्वीचच सुरू केलं नव्हतं. विमानातील कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. दरम्यान विमान मुंबई विमानतळावर पुन्हा लँड केल्यानंतर प्रवाशांवर उपचार सुरू करण्यात आले. सध्या, या प्रकरणाची डीजीसीएकडून चौकशी करण्याचे आदेश दिले असून संबंधित कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.


हेही वाचा -

मुंबई-अहमदाबाद इंडिगो विमानाचा टायर फुटला, प्रवासी सुखरूप

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा