'या' कारणामुळे मुंबईतील पद्मिनी काळी-पिवळी टॅक्सी बंद

जून २०२० पासून ही टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावरून धावणं बंद होईल. पण यामागे नेमकं काय कारण आहे? मुंबई टॅक्सी युनियनचं यावर काय मत आहे हे जाणून घ्या...

SHARE

मुंबईच्या रस्त्यावर धावणारी काळी पिवळी पद्मिनी टॅक्सी जून २०२० साली बंद होणार आहे. आयकॉनिक इंडो इटालियन मॉडेलची प्रीमियम पद्मिनी टॅक्सीचे उत्पादन २००० मध्ये बंद झाले होते. यानंतर केवळ ५० टॅक्सी रस्त्यांवर धावत होत्या. पण जून २०२० पासून ही टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावरून धावणं बंद होईल


'या' कारणामुळे बंद

२०१३ साली वाढणारं प्रदूषण पाहता २० वर्ष जुन्या वाहनांवर प्रतिबंध लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. यामुळे या कार बंद करण्यात आल्या आहेत. पण पद्मिनी टॅक्सीची उणीव प्रवाशांना नक्कीच जाणवेल. कारण काळी-पिवळी गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांवर धावत आहे. प्रवाशांच्या भावना टॅक्सीशी जोडल्या गेल्या आहेत


मुंबई टॅक्सी युनियननुसार, काळी-पिवळी ही प्रतिष्ठीत कार आहे. परंतु नवी पिढी यात बसण्यास जास्त इच्छित नसते. हल्ली आलेल्या वातानुकुलित आणि नवं तंत्रज्ञान असलेल्या मॉर्डन कारना पसंती देतात. शिवाय महागाईमुळे काळ्या-पिवळ्या पद्मिनी टॅक्सीची देखभाल करण परवडणारं नाही.    


पद्मिनी नाव कसं पडलं?

१९६४ साली फिअॅट ११०० डिलाइटच्या नावे बाजारात उतरवले होते. हे फिअॅट ११०० चे स्वदेशी वर्जन होते. परंतु लॉन्चिंगच्या १ वर्षानंतर याचे नाव बदलून प्रीमिअर प्रेसिडेंट ठेवण्यात आले. १९७४ साली पुन्हा याचे नाव बदलून प्रीमिअर पद्मिनी ठेवण्यात आले. हे नामकरण पद्मिनीच्या नावे ठेवण्यात आलेहेही वाचा

तिकिटांच्या काळा बाजारामुळे मध्य रेल्वेला ६१ लाखांचा तोटा

बेस्टच्या 'या' कल्पनेला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद


संबंधित विषय
ताज्या बातम्या