Advertisement

बेस्टच्या 'या' कल्पनेला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद


बेस्टच्या 'या' कल्पनेला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद
SHARES

मुंबईत काही वर्षांपूर्वी अॅपवर आधारीत ओला-उबेर टॅक्सी सेवा सुरू झाली. या ऑनलाइन टॅक्सी सेवेमुळं मुंबईची दुसरी लाइफलाइन असलेल्या बेस्ट बसच्या प्रवाशांमध्ये घट झाली. प्रवासी संख्या कमी झाल्यानं बेस्टच्या उत्पनातही मोठी घट झाली. त्यामुळं कमी झालेली ही प्रवासी संख्या भरून काढण्यासाठी बेस्ट उपक्रमानं तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, प्रवाशांना किमान प्रवासासाठी ५ रुपये आणि एसी बसच्या किमान प्रवासासाठी ६ रुपये मोजावे लागत आहेत. मात्र, बेस्टच्या या निर्णयानंतर प्रवासी संख्येत वाढ झाली. परंतु, बेस्टकडं सुट्ट्या नाण्यांचा खच पडू लागला आहे.

बेस्टनं ९ जुलैपासून तिकीट दरात कपात केली. बेस्टच्या या निर्णयाला आता ४ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, या कालावधीत बेस्टच्या सर्व डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात ५ आणि १० रुपयांच्या चिल्लर जमा झाल्या आहेत. बेस्टकडं दररोज १० ते १२ लाख रुपयांची नाणी जमा होत आहेत. त्यामुळं या चिल्लर कमी करण्यासाठी बेस्टनं एका नवा उपक्रम हाती घेतला.

दररोज नाण्याच्या संख्येत वाढ होत असल्यानं बेस्टनं ही नाणी संपुष्टात आणण्यासाठी सर्व बस डेपोंमध्ये सुट्ट्यांची निकड असलेल्यांसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. सुट्ट्या पैशांमध्ये वाढ होत असल्यानं त्याचं व्यवस्थापन करणं बेस्टला कठीण जातं आहे. त्यामुळं जमा झालेली ही चिल्लर कमी करण्यासाठी 'ज्यांना चिल्लर पाहीजे त्यांच्यासाठी सर्व बस आगारात व्यवस्था करण्यात आली आहे.

बेस्टच्या मुंबईतील २७ बस आगारांतील तिकीट, रोख विभागात सुट्टी नाणी आणि नोटा वितरित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत सुट्टी नाणी आणि नोटा वितरित करण्यात येत आहेत. केवळ रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचा दिवशी ही सुविधा बंद असते.

बेस्टच्या या उपक्रमाला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसंच, या उपक्रमाच्या माध्यमातून दर दिवसाला अंदाजित ५०० ते १००० रुपयांची चिल्लर जात असल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली. त्याचप्रमाणं हळूहळू लोकांना याबाबत माहिती मिळत असल्यानं या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईतील बेस्टचे २७ डेपो मिळून आतापर्यंत १४ लाख २५ हजार चिल्लर एक्सचेंज झाल्या आहेत. आतापर्यंत मुंबईतील मुंबई सेन्ट्रल या डेपोतून जवळपास १ लाख ५० हजार रुपयांची चिल्लर एक्सचेंज झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे.


तिकीट दरात कपात

नवे तिकीट दर


किलोमीटर

साधी बस

एसी बस


५ रुपये

६ रुपये

१०

१० रुपये

१३ रुपये

१५

१५ रुपये

१९ रुपये

१५ किमी. पुढे

२० रुपये

२५ रुपये


बसपास


किलोमीटर

साधी बस


दरम्यान,

एसी बसमासिक

त्रैमासिक

मासिक

त्रैमासिक


२५० रुपये

७५० रुपये

३०० रुपये

९०० रुपये

१०

५०० रुपये

१५०० रुपये

६५० रुपये

१९५० रुपये

१५

७५० रुपये

२२५० रुपये

९५० रुपये

२८५० रुपये

१५ किमी. पुढे

१००० रुपये

३००० रुपये

१२५० रुपये

३७५० रुपये


विद्यार्थ्यांसाठी बसपास


इयत्ता

मासिक

त्रामासिक

अर्धवार्षिक

५ वीपर्यंत

२०० रुपये

६०० रुपये

१००० रुपये

६वी ते १०वी

२५० रुपये

७५० रुपये

१२५० रुपये

१२ वीपर्यंत

३५० रुपये

१०५० रुपये

१७५० रुपये
हेही वाचा -

संतप्त PMC खातेधारकांचा अर्थमंत्र्यांना घेराव, सीतारमण यांनी दिलं 'हे' आश्वासन

'त्याने' पक्ष बदलताच राज ठाकरेंच्या फोटोच्या जागी आले...
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement