Advertisement

संतप्त PMC बँक खातेधारकांचा अर्थमंत्र्यांना घेराव, सीतारमण यांनी दिलं 'हे' आश्वासन

मुंबईत आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पंजाब आणि महाराष्ट्र काे- आॅपरेटीव्ह बँकेच्या संतप्त खातेधारकांनी गुरूवारी घेराव घातला.

संतप्त PMC बँक खातेधारकांचा अर्थमंत्र्यांना घेराव, सीतारमण यांनी दिलं 'हे' आश्वासन
SHARES

मुंबईत आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पंजाब आणि महाराष्ट्र काे- आॅपरेटीव्ह बँकेच्या संतप्त खातेधारकांनी गुरूवारी घेराव घातला. यानंतर बँक ग्राहकांशी चर्चा करून रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांना ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्याची विनंती करेन, असं त्या म्हणाल्या.

निषेधाच्या घोषणा

सीतारमण गुरूवारी सकाळी भाजपच्या नरिमन पाॅईंट येथील कार्यालयात आल्या होत्या. त्याची माहिती मिळालेल्या पीएमसी बँक ग्राहकांनी भाजपच्या कार्यालयाबाहेर जमत निषेधाच्या घोषणा दिल्या. तसंच सीतारमण यांच्याशी बोलू देण्याची मागणी केली. बँक ग्राहकांच्या काही प्रतिनिधींनी त्यांना घेरावही घातला. त्यानंतर सीतारमण यांनी बँक ग्राहकांच्या प्रतिनिधींना बोलावून घेत त्यांच्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन दिलं.

काय म्हणाल्या सीतारमण?

बँक ग्राहकांशी चर्चा केल्यानंतर सीतारमण म्हणाल्या की, पीएमसी बँक घोटाळा आणि सरकारचा कुठलाही प्रत्यक्ष संबंध नाही. तरी बँक ग्राहकांच्या अडचणी समजून मी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना भेटून त्यांना बँक ग्राहकांच्या अडचणी दूर करण्याची विनंती करेन, असं सीतारमण म्हणाल्या.

अर्थमंत्रालयाला सूचना

अर्थमंत्रालयातील सचिवांना या प्रकरणाचा अभ्यास करण्याच्या सूचना केल्या आहेत. अर्थमंत्रालयाच्या सचिवांसोबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी देखील असणार आहेत, असं सीतारामण म्हणाल्या.

याआधीही या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी ‘एचडीआयएल’ कंपनीचे प्रवर्तक सारंग वाधवा आणि राकेश वाधवा यांना कोर्टात हजर करताना पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी त्यांना घेराव घालत त्यांना जामीन न देण्याची मागणी केली होती.



हेही वाचा-

PMC घोटाळा: वाधवा बंधूंना १४ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

PMC बँक घोटाळा: निलंबीत व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा