Advertisement

कल्याण-तळोजा मेट्रो आता नवी मुंबईपर्यंत! बेलापूर-पेंधर मार्गिकेशी जोडली जाणार

येत्या काही वर्षांत प्रवाशांना कल्याण ते बेलापूर दरम्यान प्रवास करण्याचा सोपा आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे

कल्याण-तळोजा मेट्रो आता नवी मुंबईपर्यंत! बेलापूर-पेंधर मार्गिकेशी जोडली जाणार
SHARES

कल्याण-डोंबिवली-तळोजादरम्यान प्रस्तावित ‘मेट्रो १२’ मार्गिकेला नवी मुंबईतील बांधून सज्ज असलेल्या बेलापूर-पेंधर या मार्गिकेशी जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत कल्याण ते बेलापूरदरम्यान ये-जा करण्यासाठी प्रवाशांना सुलभ आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे.

नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या शहरांना जोडण्यासाठी एमएमआरडीएने ‘कल्याण-डोंबिवली-तळोजा’ ही ‘मेट्रो १२’ मार्गिका आखली आहे. २०.७५ किमी लांबीच्या आणि १८ स्थानकांचा समावेश असलेल्या मार्गिकेच्या बांधकामासाठी निविदा मागविल्या होत्या. या मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार होते.

या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. अंदाजे ५,८६५ रुपये इतक्या खर्चाच्या या कामासाठी १९ निविदा सादर झाल्या होत्या. पण आता ही निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा