Advertisement

खार रोड स्थानकाचा होणार कायापालट, जुन 2024 पर्यंत नव्या सुविधा सुरू

पश्चिम आणि हार्बर मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या खार रोड स्थानकाचा कायापालट होणार आहे.

खार रोड स्थानकाचा होणार कायापालट, जुन 2024 पर्यंत नव्या सुविधा सुरू
SHARES

पश्चिम आणि हार्बर मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या खार रोड स्थानकाचा कायापालट होणार आहे. गर्दी नियोजनासाठी होम फलाट, प्रशस्त डेक आणि सरकते जिने अशा अनेक सुविधा सुरू करण्यात येणार आहेत.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) या सुधारणा आराखड्याला मंजुरी मिळताच काम सुरू करण्यात आले आहे. या सुविधा जून २०२४ अखेर प्रवाशांसाठी खुल्या होणार आहेत.

ब्रिटिशांनी उभारलेल्या रेल्वे स्थानकात खार रोडचा समावेश होतो. या स्थानकापासून वांद्रे टर्मिनस जवळ आहे. यामुळे पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वे आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी प्रवास करणाऱ्यांची स्थानकात मोठी वर्दळ असते.

रेल्वे स्थानकातील रोजची सरासरी प्रवासी संख्या एक लाख ६२ हजार ५०४च्या घरात आहे. काळानुरूप प्रवासी वाढले असले तरी स्थानकात आवश्यक बदल झालेले नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. हे टाळण्यासाठी १० मीटर रुंदीचा प्रशस्त डेक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या डेकला स्थानकातील सर्व पुलांची जोडणी देण्यात येणार आहे.

लिफ्टसह चार सरकते जिनेदेखील बसवण्याचे नियोजन आहे. या प्रस्तावित सुधारणेसाठी पूल, डेक, सरकते जिने, स्कायवॉक यांच्या सर्वसाधारण आरेखनाला 'एमआरव्हीसी'कडून मंजुरी देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेवरील १० आणि पश्चिम रेल्वेवरील आठ स्थानकांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय 'एमआरव्हीसी'ने घेतला आहे. हे काम टप्याटप्याने सुरू करण्यात येणार आहे.

नव्या सुविधा कुठल्या?

  • १० मीटर रुंदीचा प्रशस्त डेक
  • डेकवर तिकीट बूकिंग कार्यालय
  • २२.५ मीटर डेकवर सर्व पुलांची जोडणी
  • प्रवाशांसाठी डेकवर स्वच्छतागृहे
  • स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या पादचारी पुलाचा विस्तार
  • स्थानकातील ४.५ मीटर पादचारी पुलाच्या जागी सहा मीटरचा पूल
  • चर्चगेटच्या दिशेला सात मीटर रुंदीचा पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा स्कायवॉक
  • सुधारणा कामांसाठी ८० कोटी रुपये खर्च



हेही वाचा

ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर पुढील वर्षी आणखी एक स्थानक होणार

स्वच्छता गृहातील कमोड स्वच्छ राखण्यासाठी मध्य रेल्वेची अनोखी आयडिया

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा