Advertisement

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं कंत्राट एल अॅण्ड टी ला

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या गुजरातमधील कामाचं कंत्राट लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोला देण्यात आलं आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं कंत्राट एल अॅण्ड टी ला
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या गुजरातमधील कामाचं कंत्राट लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोला देण्यात आलं आहे. पीटीआयने यासंबधीचं वृत्त दिलं आहे.

गुजरात आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यातील जमीन अधिग्रहणावरून बुलेट ट्रेनला (Mumbai-Ahmadabad bullet train project) जोरदार विरोध होत आहे. शिवाय मोठ्या निधीची आवश्यकता असलेले डोईजड प्रकल्प राबवण्यास ठाकरे सरकारचा विरोध आहे, अशा स्थितीत महाराष्ट्रातील जमीन अधिग्रहण (bullet train land acquisition) आणि इतर कामाकडेही सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सप्टेंबर महिन्यात नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) १.०८ लाख कोटी रुपयांच्या गुजरातमधील कामासाठी निविदा काढली होती. त्यासाठी ८ कंपन्या बोली लावण्यासाठी पात्र ठरल्या होत्या. यापैकी एल अॅण्ड टी कंपनी (L & T) गुजरातमधील कामाची २५ हजार कोटी रुपयांची बोली जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. कंपनीवर पुढील ४ वर्षांमध्ये काम पूर्ण करण्याचं बंधन असेल. (L&T wins 25000 crore rupees order for gujarat stretch of bullet train project )

हेही वाचा- बुलेट ट्रेनवरून केंद्र-राज्यात जुंपणार

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ५०८ किमी लांबीचा असून या ट्रेनमुळे या दोन राज्यातील अंतर अवघ्या दोन तासांत गाठता येणार आहे.

निविदेनुसार एल अॅण्ड टी ला वापी, सूरत, भरूच आणि बिल्लीमोरा अशी ४ स्थानकं, २४ नद्या, ३० महामार्ग क्रॉसिंग अशी वापी ते वडोदरा या दरम्यान एकूण आखणीच्या ४७ टक्के कामं करायची आहेत.

एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रमण्यम यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, एल अॅण्ड टीच्या इतिहासाप्रमाणेच कंपनीने ही बोली यशस्वीरित्या जिंकली आहे. केंद्र सरकारचं हे मोठं आणि प्रतिष्ठित कंत्राट आहे. ४ वर्षांमध्ये कंपनीला हे काम पूर्ण करायचं आहे, दिलेल्या वेळेत काम पूर्ण होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा