Advertisement

लोकल प्रवास बंद असल्यानं मेट्रोच्या प्रवासी संख्येत घट

लोकल प्रवास सर्वासाठी खुला नसल्याने अद्याप अपेक्षित प्रवासी संख्या गाठता आलेली नाही.

लोकल प्रवास बंद असल्यानं मेट्रोच्या प्रवासी संख्येत घट
SHARES

सर्वसामान्यांसाठी अद्याप लोकल सेवा बंद असल्यानं त्याचा परिणाम मुंबई मेट्रोवर होत असल्याची माहिती समोर येत आहे. घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो १ ची सेवा सुरू झाल्यानंतर महिनाभरात प्रवासी संख्या तिपटीपेक्षा अधिक झाली असली तरी लोकल प्रवास सर्वासाठी खुला नसल्याने अद्याप अपेक्षित प्रवासी संख्या गाठता आलेली नाही.

तब्बल ७ महिन्यांनंतर १९ ऑक्टोबरपासून घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो १ची सेवा सुरू झाल्यावर आठवड्याभरातच प्रवासी संख्या दुपटीवर पोहोचली. कोरोनापूर्व काळातच सर्वसाधारणपणे एका मेट्रो रेल्वेगाडीतून एका वेळी सुमारे १३५० प्रवासी प्रवास करत होते. परंतु आता करोनाच्या पार्श्वभूमीवर बैठकव्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले. त्यामुळे सध्या एका वेळी केवळ ३६० प्रवासी प्रवास करू शकतात.

मेट्रो १ मार्गिकेवर दिवसाला २०० फेऱ्या होत असून सुमारे ७२ हजार प्रवासी अपेक्षित आहेत. ही संख्या किमान ६० हजारांपेक्षा अधिक होण्याची अपेक्षा मेट्रो १ प्रशासनास होती. मात्र अद्याप दिवसाला केवळ ४५ हजार प्रवासी या सेवेचा लाभ घेत असल्याचं समजतं.

महिलांना उपनगरी सेवेनं ठरावीक वेळेत प्रवास करण्याची मुभा दिल्यानंतर प्रवासी संख्येत काही प्रमाणात वाढ झाली. मात्र अद्याप सर्वानाच उपनगरी रेल्वेनं प्रवासाची परवानगी नाही. कोरोनापूर्व काळात दिवसाला सुमारे ४ लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत होते. त्यापैकी २ लाख प्रवासी घाटकोपर आणि अंधेरी स्थानकातून प्रवास करत होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा