Advertisement

पंचवटी एक्सप्रेसला आता नवे एलएचबी डब्बे


पंचवटी एक्सप्रेसला आता नवे एलएचबी डब्बे
SHARES

छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ते मनमाड अशी धावणारी पंचवटी एक्सप्रेस बुधवारपासून म्हणजेच ९ मे पासून नव्या एलएचबी डब्ब्यांसह चालवण्यात आली आहे. यामुळे सुरक्षेत वाढ आणि प्रवाशांना आणखी आरामदायी प्रवास मिळणं शक्य होणार आहे.



नव्या एलएचबी डब्ब्यांत अत्याधुनिक शौचालये, आरामदायक सीट्स उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ही ट्रेन सकाळी मनमाडहून मुंबईसाठी रवाना करण्यात आली. तसंच पुन्हा मुंबईहून मनमाडसाठी सोडण्यात आली. यावेळी या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अगदी उत्साहात या ट्रेनचं स्वागत केलं.



या ट्रेनची वैशिष्ट्ये

० ३ एसी कोच, महिलांसाठी एक द्वितीय श्रेणी डब्बा आणि त्यासह १६ डब्बे
० १०० % जैव शौचालय रेक
० १३൦ किमी प्रति तास गतीने चालवण्यासाठी योग्य
० नॉन एसी कोचच्या मागील बाजूस नाश्त्याची व्यवस्था
० अधिक आरामदायक कुशन सीट्स
० शौचालयात स्टेनलेस स्टील फिटिंग
० मोठ्या खिडक्या
० मोठ्या सामानासाठी वेगळा रॅक
० एसी कोचमध्ये सर्व सीट्सवर वाचनासाठी लॅम्प
० सर्व सीट्सला फुट रेस्टची सुविधा



हेही वाचा

उन्हाळी सुट्ट्यांसाठी मुंबई-करमाळी अतिरिक्त ६ स्पेशल ट्रेन्स


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा