Advertisement

लोकल सुरू झाल्यानं महापालिकेची यंत्रणा सतर्क

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी गर्दी न करता सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

लोकल सुरू झाल्यानं महापालिकेची यंत्रणा सतर्क
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी गर्दी न करता सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे. मात्र, मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा सर्वांसाठी सुरू झाल्यानं महापालिका यंत्रणा सतर्क झाली आहे. दररोज लाखो मुंबईकर रेल्वेतून प्रवास करणार असल्यानं पुढील २ आठवडे महत्त्वाचे ठरणार आहेत. शिवाय, या काळात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुंबईतील रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.१२ टक्क्यांवर आला आहे. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ५६४ दिवसांचा आहे. मार्च २०२० ते ३१ जानेवारी २०२१ पर्यंत ३ लाख ९ हजार २९७ बाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर आतापर्यंत ९४ टक्के कोरोनामुक्त झाले आहेत. तसंच, सध्या ५ हजार ६५६ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, मार्च २०२० पासून बंद ठेवण्यात आलेली लोकल सेवा सोमवारपासून सर्वांसाठी सुरू करण्यात आली आहे. यामुळं लाखोंच्या संख्येनं प्रवासी दररोज प्रवास करणार असल्यानं कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका कायम आहे.

रेल्वे प्रवासासाठी ३ वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसंच, रेल्वे स्थानकांवर गर्दी होणार नाही, याची खबरदारी पोलीस व रेल्वे प्रशासन घेत आहेत. मात्र, रेल्वे प्रवासात सोशल डिस्टन्सिंग शक्य नाही. त्यामुळं कोरोना काळजी केंद्र, स्वतंत्र रुग्णालयं, जम्बो केंद्रं आणखी काही काळासाठी सुरू ठेवण्यात येणार आहेत. खबरदारी म्हणून महापालिकेनं ७ जम्बो कोविड केंद्र आणि ३९ कोविड काळजी केंद्र ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा