Advertisement

आता घर बसल्या 'असे' मिळवा लर्निंग लायसन्स

पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी लर्निंग लायसन्ससाठीच्या परीक्षेबद्दलची माहिती दिली.

आता घर बसल्या 'असे' मिळवा लर्निंग लायसन्स
SHARES

कोरोनामुळे लागू निर्बंधामुळे अनेकांना लर्निंग लायसन्स काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र सरकारनं नागरिकांच्या या समस्येवर पर्याय शोधत मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारनं लर्निंग लायसन्ससाठी घेण्यात येणारी परीक्षा घरातून देण्यास परवानगी दिली आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी लर्निंग लायसन्ससाठीच्या परीक्षेबद्दलची माहिती दिली. राज्यातील ५० आरटीओ कार्यालयांना तसे आदेश देण्यात आले आहेत.

आरटीओकडून लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लर्निंग लायसन्स दिले जाते. ही परीक्षा आरटीओ कार्यालयातच घेतली जात होती.

त्यामुळे नागरिकांकडे कार्यालयात जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नसायचा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे या परीक्षेबद्दल राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला.

आता राज्यात लर्निंग लायसन्ससाठी द्यावी लागणारी परीक्षा घरातूनच देता येणार आहे. पण त्यासाठी आधार कार्ड असणं आवश्यक आहे.

ही सुविधा पुढील दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरू करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लायसन्स आणि वाहन नोंदणी करण्यासाठी देशभरात एनआयसी आणि सारथी या दोन्ही संकेतस्थळावर आवश्यक ते बदल करण्यात आलेले असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

लर्निंग लायसन्स काढण्यासाठी वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागतो. त्यात आपली सविस्तर माहिती भरावी लागते. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आरटीओकडून वेळ उपलब्ध करून दिली जाते. परीक्षेची तारीख कधी लवकर मिळते, तर कधी महिनाभर वाट बघावी लागते. पण, नव्या सुविधेमुळे यात बदल होणार आहे.

परीक्षा देण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध सारथी सेवेत प्रवेश करताच परवाना पर्याय उपलब्ध होईल. त्यात आधार क्रमांक नमूद केल्यानंतर त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती येईल आणि तो अर्ज करू शकणार आहे.



हेही वाचा

मुंबई लोकलच्या प्रवासी संख्येत ११ लाखांनी वाढ

प्रवासी संख्येत घट झाल्यानं एसटीला ६,३०० कोटी रुपयांचा तोटा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा