Advertisement

बेस्ट बस आता पूर्ण क्षमतेने धावणार

बेस्ट बसमधून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. परवानगी देताना प्रवाशांना आणि बेस्ट प्रशासनाला काही अटीही घालून दिल्या आहेत.

बेस्ट बस आता पूर्ण क्षमतेने धावणार
SHARES

मुंबईत आता बेस्ट बस पूर्ण क्षमतेने धावणार आहे. बेस्ट बसमधून पूर्ण क्षमतेने
प्रवासी वाहतूक करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. परवानगी देताना प्रवाशांना आणि बेस्ट प्रशासनाला काही अटीही घालून दिल्या आहेत. 

बेस्ट बसेसमध्ये प्रवास करताना प्रवाशांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करावे, बसेसचे निर्जंतुकीकरण नियमितपणे करावे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या इतर अटींचे पालन करावे अशा अटी पाळाव्या लागणार आहेत. 

बेस्ट बसमधून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यासाठी मंजुरी मिळावी अशी मागणी करणारे पत्र बेस्ट महाव्यवस्थापकांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांना दिलं होतं. १८ सप्टेंबर रोजीच्या या पत्रावर शुक्रवारी निर्णय घेण्यात आला. यानुसार बेस्टला पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. 

खासगी क्षेत्रांत काम करणारे बहुतांश कर्मचारी बेस्टच्या बसमधूनच कामावर ये-जा करत आहेत. बेस्टच्या बसेसमधून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक होणार असल्याने या कर्मचाऱ्यांची प्रवास कोंडी मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे. 



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाच्या १४ लाख चाचण्यांचा टप्पा पार

खाजगी सुरक्षारक्षकांना लोकलने प्रवासाची परवानगी



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा