Advertisement

खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी राज्य सरकारची परवानगी

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होऊ होत असून, अनेक प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे.

खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी राज्य सरकारची परवानगी
SHARES

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होऊ होत असून, अनेक प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळं राज्य सरकारनं खासगी प्रवासी बस, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली आहे.

एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांवर न्यायालयाच्या सूचनेनुसार तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव एसटी कर्मचारी संघटनांनी सोमवारी फेटाळला. यामुळे राज्यातील एसटी सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. सरकारने संपकरी कर्मचार्‍यांवर कारवाईचा इशारा दिल्याने संप चिघळण्याच्या मार्गावर आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करून कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागणी हा संप सुरु आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. मागण्या मान्य होत नाही तोवर संप सुरू राहणार असल्याचा इशारा याअगोदरच कर्मचाऱ्यांनी दिला होता. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं मध्यस्थी करत त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली. सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली. मात्र ही समिती स्थापन केल्यानंतर देखील एसटी कर्मचारी संघटना संपावर ठाम असल्याची माहिती समोर येत आहे.

संपावर ठाम असल्यानं मंगळवारी दुसऱ्या दिवशीही एसटी रस्त्यावर येण्याची शक्यता नाही. सोमवारी ९० टक्के कामगार हजर नव्हते. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्यासाठी सरकारनं त्रिसदस्यीय समितीही स्थापन केली आहे.

न्यायालयात याबाबत सरकारनं माहिती दिल्यानंतरही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे मंगळवारी म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी राज्यभरात एसटी बंद राहण्याची चिन्हं आहेत. प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. दरम्यान, एसटी ठप्प झाल्यानं सरकारनं खाजगी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस आणि मालवाहू वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा