Advertisement

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोल माफ

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारनं महत्वाची घोषणा केलीय.

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोल माफ
SHARES

बस आणि रेल्वेनं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसह आपल्या खासगी गाड्यांनी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही अधिक असते. अशा चाकरमान्यांसाठीही सरकारनं महत्वाची घोषणा केलीय. या चाकरमान्यांसाठी मुंबई, गोवा, पुणे महामार्गांवर टोल माफ करण्यात येणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी माहिती दिलीय.

कोकणात आपल्या खासगी गाड्यांनी जाणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई, गोवा, पुणे महामार्गावर टोल माफ केला जाईल. टोलमाफीसाठी स्टिकर पुरवण्यात येणार आहेत. त्यासाठी चाकरमान्यांना आपल्या वाहनांची नोंद करावी लागणार आहे.

गणेश आगमनाच्या दोन दिवस आधीपासून टोल माफीला सुरुवात होईल. त्यानंतर गणेश विसर्जनानंतर दोन दिवसांपर्यंत ही टोल माफी असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी यंदाही मुंबई-गोवा, मुंबई-कोल्हापूर मार्गावर नियोजन, खड्डे दुरुस्ती, पोलीस, वाहतूक पोलीस अशा सर्व उपाययोजना करण्यासाठी सोमवारी बैठक झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली. कोकण मार्गावर टोल सवलत दिली जाणार आहे. टोल स्टिकर देण्याबाबत आज निर्णय झाला. यासाठी नागरिकांनी आपल्या गाडीची माहिती दिल्यानंतर त्यांना स्टिकर दिले जाणार आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.

दरम्यान, कोरोनाचं संकट लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर आरोग्य पथकं तैनात करण्यात आली आहेत. चाकरमन्यांची पहिल्यांदा कोरोना चाचणी केली जाईल मगच त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल. या आरोग्य पथकांद्वारे जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी आणि चाचणी करण्यात येणार आहे.

दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना थेट प्रवेश दिला जाणार आहे. तसंच आरटीपीसीआर चाचणी करून 72 तास व्हायच्या आधी आलेल्या प्रवाशांना तपासणी शिवाय जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे. अन्य सर्व प्रवाशांची सीमेवर रॅपिड टेस्ट करूनच मग प्रवेश दिला जाणार आहे.



हेही वाचा

कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव विशेष रेल्वे आणि एसटी बस फुल

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा