Advertisement

प्रवाशांना दिलासा! एसटी स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ

एसटी महामंडळाच्या विविध सवलतींसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य असून, अनेक प्रवाशांनी हे स्मार्ट कार्ड काढलेलं नाही. त्यामुळं या प्रवाशांना या कार्डाचा लाभ मिळावा यासाठी १ जानेवारी २०२० पर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवाशांना दिलासा! एसटी स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ
SHARES

एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळाच्या विविध सवलतींसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य असून, अनेक प्रवाशांनी हे स्मार्ट कार्ड काढलेलं नाही. त्यामुळं या प्रवाशांना या कार्डाचा लाभ मिळावा यासाठी १ जानेवारी २०२० पर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवाशांची गैर सोय

मुंबईस राज्यभरात अनेक जण प्रवासासाठी एसटी बसचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळं प्रवाशांची गैर सोय होऊ नये यासाठी मुदत वाढ करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानं स्मार्ट कार्ड घेण्यासाठी एसटी केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. त्याशिवाय ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदी सवलतधारकांना स्मार्ट कार्ड देण्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.

सवलीतींचा लाभ

एसटी महामंडळाच्या सवलीतींचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड असणं बंधनकारक आहे. त्यामुळं सर्व सवलतधारकांनी ३१ डिसेंबर २०१९ अखेर संबंधित यंत्रणांकडं संपर्क साधून स्मार्ट कार्ड काढायचे आहेत. सध्या ज्यांनी स्मार्ट कार्ड काढली आहेत त्यांना स्मार्ट कार्डच्या आधारे प्रवास सवलत देण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळानं स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा -

महापालिकेची पहिल्या दिवशी ५६ वाहनांविरुद्ध कारवाई

राज ठाकरे दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा