महापालिकेची पहिल्या दिवशी ५६ वाहनांविरुद्ध कारवाई

मुंबई महापालिकेतर्फे सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर परिसरात अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, पहिल्याच दिवशी एकूण ५६ वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

SHARE

मुंबई महापालिकेतर्फे सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर परिसरात अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, जी दक्षिण विभागात पहिली कारवाई करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी एकूण ५६ वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यावेळी ९ वाहनमालकांनी प्रत्येकी १० हजार रुपये दंड भरून वाहनं सोडवली. तर, उर्वरित ४७ वाहनं महापालिकेच्या ताब्यात आहेत. त्याशिवाय ही वाहनं परत देताना दंडासह विलंब शुल्क आकारला जाणार आहे.

दंडात्मक कारवाई

अनधिकृत पार्किंगविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले होते. या कारवाईअंतर्गत संबंधित परिसरात एखादे अवजड वाहन अनधिकृतपणं उभे असल्याचे आढळल्यास त्यावर किमान १५ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मध्यम आकाराच्या वाहनांवर रुपये ११ हजार रुपये आणि कार-जीप यांसारख्या वाहनांवर १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. रिक्षा, साइडकार असलेले दुचाकी वाहन इत्यादी ३ चाकींवर ८ हजार रुपये, तर अनधिकृतपणे पार्क केलेल्या दुचाकी वाहनांवर किमान ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

परिमंडळ- एक ८ चारचाकी वाहनं
परिमंडळ - दोन ३ चारचाकी वाहनं
दंड वसूल - २० हजार रुपये

परिमंडळ - तीन
१२ चारचाकी
५ दुचाकी
दंड वसूस - ४० हजार रुपये

परिमंडळ - चार
१२ चारचाकी
दंड वसूल - १० हजार रुपये

परिमंडळ - सहा
६ चारचाकी
१ तीन चाकी
३ दुचाकी
दंड वसूल – १० हजार रुपये

परिमंडळ - सात
४ चारचाकी
२ तीन चाकी
दंड वसूल १० हजार रुपये


दंडाची रक्कम विकासकामांसाठी

महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर परिसरात अनधिकृत पार्किंगविरोधातील कारवाईत दंडापोटी जमा होणारी रक्कम त्या-त्या विभागातील विकासकामांवर खर्च करण्यात येणार आहे.हेही वाचा -

मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी, अनेक भागांत साचलं पाणी

मुंबईसह राज्यातील रिक्षाचालक ९ जुलैला संपावरसंबंधित विषय
ताज्या बातम्या