Advertisement

एसटी बस होणार चकाचक


एसटी बस होणार चकाचक
SHARES

केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियान उपक्रम राबवला जात असताना, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळात थोर सामाज सुधारक संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्प उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी महामंडळातर्फे महात्मा गांधी जयंतीपासून संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाला सुरुवात करण्याची घोषणा परिवहन मंत्री रावते यांनी केली. त्यानुसार प्रवाशांना एसटीची सर्व बसस्थानके, बस चकाचक दिसणार आहेत.

संत गाडगेबाबा यांचा आदर्श ठेवून स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या मूलभूत संकल्पनेवर आधारीत एसटी महामंडळाने बस, बसस्थानक, प्रसाधन गृहे आणि चालक-वाहक विश्रांती गृहे स्वच्छ करण्यात येणार आहे. यासाठी महामंडळातर्फे एका बहिस्थ संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. 

यासोबतच प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली जाणार आहे. या संकल्पनेद्वारे चकाचक बस आणि टापटीप बस स्थानके, प्रसाधनगृहे प्रवाशांच्या सेवेत तत्पर राहतील, असा विश्वास रावते यांनी व्यक्त केला आहे.


हेही वाचा - 

एसटी बसस्थानकावर आता दिवाळीच्या फराळाचा 'स्टँड'



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा