Advertisement

सर्व एसटी स्टॅण्ड येणार सीसीटीव्हीच्या निगराणीत


सर्व एसटी स्टॅण्ड येणार सीसीटीव्हीच्या निगराणीत
SHARES

बस स्थानकावर होणाऱ्या चोऱ्या अथवा इतर अनुचित प्रकारांना आळा बसण्यासाठी आता परिवहन विभागातर्फे 'सावध रहा मोहीम' राबवण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत मुंबई तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक बस आगारावर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून ही मोहीम सुरू करण्यात येत आहे.


गुन्हेगारीला आळा बसणार?

एसटी स्थानकावरील वर्दळीचा गैरफायदा घेऊन पाकिटमार, किरकोळ चोऱ्या, महिलांची छेडछाड अशा गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांना आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक बसस्थानकावर CCTV कॅमेरे बसवण्याचे नियोजन केले आहे. आगारातील कार्यशाळेत आणि परिसरात महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे बसवणे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यापैकी एक कॅमेरा थेट आगार व्यवस्थापकांच्या (डेपो मॅनेजर) कार्यालयात बसवण्यात येणार असल्यामुळे तेथील कामकाजाची माहिती वरिष्ठ कार्यालयापर्यंत सहज पोहचणे शक्य होणार आहे.

या CCTV कॅमेऱ्यावर दैनंदिन नजर ठेवण्याची जबाबदारी एसटीच्या सुरक्षा विभागावर सोपवण्यात आली आहे. यासह आक्षेपार्ह घटनेची माहिती या विभागामार्फे त्वरित वरिष्ठांकडे कळवण्याची सोय देखील करण्यात आली आहे. बुधवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संचालक मंडळाच्या 281 व्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. लवकरच CCTV कॅमेरे बसवण्यास सुरुवात होणार आहे.




हेही वाचा

एसटी बस आता मालवाहतूकही करणार


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा